माझा आवडता प्राणी - वाघ
माझा आवडता प्राणी वाघ आहे. वाघाचे माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. आजही काही शेकड्यांनी वाघ आपल्याकडे शिल्लक आहे.जगातील एकूण वाघातील पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत. वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे.वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे.लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात.वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतीक आहे. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्ग चक्र बिघडून जाईल वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड आणि जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्...