आठवणी टाळता येतात...
आज जुनी डायरी सापडली. तसं ती कधी हरवली नव्हती फक्त तिला नजरेआड केलं होतं.अगदी तुझ्यासारखं.पण आज डायरीसुद्धा तशीच समोर आली जशी तू आली होतीस अचानक. नकळतपणे माझा चेहरा काही झालेच नाही असा फुलला. पण दुसऱ्याच क्षणी तुझ्या डोळ्यातील ते अनोळखी भाव कुठेतरी बोचू लागले होते.पण आज ही डायरी खूप प्रसन्न होती.कारण या डायरीने फक्त आपला सहवास, आनंद, सुख, आपलेपण आणि प्रेम इतकंच अनुभवलं होतं. म्हणजे मीच तिला ते आभासी जग सत्य आहे असं भासवल होतं. त्यामुळे तिची ती प्रसन्नता पाहून मला अपराधी असल्यासारखं वाटू लागलं.ती तर आनंदली होती मला पाहून तिला वाटले होते. कदाचित आज २८४ दिवसानंतर मी काहीतरी लिहिलं. आणि डायरीला सांगेल की सगळं कसं ठीक आहे. ही डायरीच तर आमच्या प्रेमाची साक्षीदार आहे.आमचा प्रत्येक क्षण तिने अनुभवला आहे.आमच्यासोबत ती कधी हसली आहे.तर कधी शहारली आहे.म्हणजे, आमचं पहिलंवहिलं चुंबन खूप खास होतं. कारण मी इतका उत्साहीत झालो होतो की मी चक्क डोळे उघडे ठेवण्याचा बलिशपणा केला.आणि दुसऱ्याच क्षणाला श्वास अडकेल या भीतीने तिला दूर लोटून मूर्खपणा.त्यावेळी ही डायरी खूप हसली होती माझ्यावर अगदी तुझ...