पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकनिष्ठता ही मजबुरी नसावी..

इमेज
पहाटेचे ३वाजले होते. तरी दोघे झोपले नव्हते. वातावरणातला गारवा दोघांच्या निर्वस्त्र शरीराला स्पर्श करून लाजत होता. स्वतःचे स्त्रीत्व झाकत ती त्याच्या उघड्या छातीवर डोके ठेऊन त्याची धडधड ऐकत छातीवरच्या केसांशी खेळत होती. तो ही तिच्या नागड्या पाठीवर बोटांनी उगीच काहीतरी रेखाटत होता.  खोलीतील प्रत्येक निर्जीव वस्तू त्यांच्याकडे चोरट्या नजरेने बघत होती. भावनिक सहवासानंतर शारीरिक सहवास आणि आता फक्त आणि फक्त स्पर्शाचा सहवास घडत होता. खरं तर शारीरिक गरज ही प्रत्येक सजीवांची गरज असते. प्रत्येक वेळेला फक्त नवीन जीव जन्माला घालण्यासाठी संभोग केला जात नाही. काही वेळेला संभोग हा आनंदासाठी केला जातो.तर काही वेळेला भावनिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या जोडीदाराला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रणय घडून आणल्या जातो. या खोलीत आज प्रणय घडून आला होता. तो,"एक सांग.! जर मी दुसऱ्याएखाद्या मुलीच्या सहवासात अशीच एखादी रात्र राहिलो तर.?" तिने जणू त्याचे काही ऐकलच नाही अशा अविर्भावात त्याला म्हणाली,"कॉफी घेणार.!मला जाम भूक लागलीये." आणि उठून अंगावर त्याचा व्हाईट शर्ट चढवत. जायला लागली ...