मी नग्न पाहिलं तिला..
तिला कधी नग्न पाहिलं का? काय म्हणालात?शरीराने? नाही.! नग्न शरीर पाहून फक्त वासना शमते. पण तिच्या विचारांची नग्नता पाहून माणूस तृप्त होतो.! कसं???? हम्मम...! तर.. विचारांची नग्नता.! तुम्ही कधी पाहिला एखादा माणूस(म्हणजे यात पुरुष आणि स्त्री दोघेही आले) नग्न अवस्थेत. पण तिला एकदा नक्की पाहिलं पाहिजे नग्न.! अगदी शरीराने, मनाने आणि विचाराने देखील.! तिला शरीराने नग्न पाहिलं की पुरुष तिच्यात रिता होतो. आणि विचाराने नग्न पाहिलं की तिच्यात सामावू लागतो. तिच्या विचारांचं नग्न असणं समाजाला कधीच मान्य नाही. तिला तिच्या स्त्री असण्याचा कधी कमीपणा वाटू नये. ती चारचौघात मासिक पाळी,सेक्स, आकर्षण या विषयावर बोलायला ती लाजत नाही. रात्रीच्या त्या प्रामाणिक सहवासानंतर तिच्या स्त्रीत्वाला ती कधी चारभिंतीच्या आत त्याच्यापासून लपवत नाही. ही गोष्ट ती मान्य करते की शरीर सुख ही तिची गरज आहे अगदी त्यांच्यासारखी. बऱ्याच वेळेला आपण माणसं नग्न या शब्दात गफलत करतो. माणसाच्या अंगावर कपडे नसणं म्हणजे नाग...