प्रेम खूप हतबल असतं..
पहिलं प्रेम, पहिली भेटं, पहिला स्पर्श, पहिल्यांदा चहा एका कपातून घेणं, मुसळधार पावसात एखाद्या मुलीसोबत एकाच छत्रीतून जाणं.(विनाकारण डोक्यात प्यार हुआ इकरार हुआ.. गाणं चालू असतं) हे सगळं विसरणं तस अवघड असतं. कारण ते सगळं पहिलं असतं. त्या पहिल्या शब्दासोबत येणारी अनामिक भीती. जाणते अजाणतेपणे असलेली ओढ. माणूस प्रेमात असला की स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करतो. असे विश्व जिथे जात, धर्म, वर्ण या गोष्टींना मानणारा समाज नसतो. आणि असला तरी त्यांना जुमानेलं ते प्रेम कसलं? पण बऱ्याचदा पहिलं प्रेम हे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहचत नसतं. त्या प्रेमाचा प्रवास नको त्या वळणावर थांबत असतो. आणि ते वळण म्हणजे जिथून U टर्न घ्यायचा मार्गच नसतो. कारण त्या पहिल्या प्रेमात माणूस पुरता वेडा झालेला असतो. वाहवत तर इतका जातो की त्याला नंतर स्वतःला शोधणे अवघड होऊन बसतं. त्यांनतर अचानक वेगळं झालं की आयुष्यात एक खालीपण येतं...