पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिल तेरे बिना लगदा नहीं...

इमेज
  बरं ऐक सॉरी..! खूप अवघड झालंय ना. पण काय करणार घरात तर बसावच लागेल.आपण मुंबईवरून औरंगाबादला येत होतो. तेव्हा तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफत.प्रश्न केला होतास,"तू मला मिस करशील ना.?" आणि मी तेव्हा निरुत्तर होतो. कारण त्या क्षणाला मला खोटं बोलायचं नव्हतं. आणि खरं सांगायचं नव्हतं. पण आज पंधरा दिवसानंतर मी तुला खरं सांगणार आहे. "तुला राग येतो ना.! जेव्हा मी म्हणतो की मी तुझ्यासाठी परफेक्ट नाहीये." खरं सांगू.! मला आयुष्यात कधी परफेक्ट व्हायचं पण नाहीये. मला तुझ्यासोबत जग विसरून तो वेडेपणा अजून पंधरा वर्षांनी सुद्धा करायचा आहे जो आपण पंधरा वर्षांपूर्वी करत होतो. तुला मी कायम म्हणतो नको करुस तो हट्टहास परफेक्ट बनण्याचा. नातं जितकं परफेक्ट होतं जात तितकं भावनाशून्य. आणि नात जपता जपता भावना जपायच्या राहून जातात.मला नाही माहीत तू माझ्याशी सहमत होशील किंवा नाही पण मला तू परफेक्ट नकोय वेंधळीच हवी आहे.जसं मुंबईवरून येतांना दाराला कुलूप लावून तीन वेळेस उघडून पाहिलं. एकदा काय तर खिडकी बंद करायची राहिली. दुसऱ्यांदा काय तर सिलेंडर बंद के...