उद्रेकाचा नसलेला लॉकडाऊन...
लॉकडाऊन लागून आता महिना उलटून गेलाय.कॉरोनाच्या माजोरड्या हिमतीपुढे संपूर्ण जग झुकलं.सगळीकडे याचं महामारीच्या चर्चेला उधाण आलंय.जो तो टीव्ही लावून स्वतःला अपडेट करत आहे.जोडीनं भीतीच राक्षण मानगुटीवर बसवून घेत आहे. विचारवंत वेगळ्याच चिंतेने त्रस्त आहेत.अर्थव्यवस्था,आंतरराष्ट्रीय संबंध,कुटुंब नियोजन,वैवाहिक संबंध.पण याच बरोबरीने अजून एक समस्या आहे.ती म्हणजे कुटुंबातील 'मी टाईम' जो हरवला आहे. का बरं? कुटुंबाची घडी या लॉकडाऊनमुळे विस्कटली आहे. खरं तर.. आपण कायम म्हणतो की या धावपळीच्या जीवनात कुटुंबासाठी, स्वतःसाठी वेळ नाही देता येत. आता आहे तो वेळ तर का देऊ शकत नाही आपण? ९० च्या दशकात जागतिकीकरणानंतर भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले त्याचाच परिणाम समाज जीवनावरही झाला.आपल्या देशाची समाजरचना जातीव्यवस्थेवर आधारित आहे पण जागतिकीकरणानंतर त्याच्याच जोडीने आपण आर्थिक स्थरातील समाजरचनाही स्वीकारली.आणि भारतामध्ये जे तीन स्थर काम करत होते.उच्चवर्गीय,मध्यमवर्गीय आणि गरी...