मनाचा गुंता सुटतो तेव्हा..

काही लोक आपल्या आयुष्यात नकळत सामील होतात.दुधात साखर मिसळावी तसे.काही वेळेला हे नाते दूध फटावे तसे फाटून जाते.
अस म्हणतात की प्रत्येक नातं हे आपला शेवट सोबत घेऊन येतो. काही वेळेला आपल्याला दुःख नाही होत तर काही वेळेला जग संपल्यासारखं वाटतं. का होत असेल असं?? आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे नात संपल्यावर तीच व्यक्ती दुसऱ्या कुठल्यातरी भूमिकेत तुमच्यासमोर येऊन उभी राहते. आणि यावेळी तुमची परिस्थिती सोडलं तर पळत आणि धरलं तर चावत अशी होते. काय करावं कळतं नाही.
४ वर्ष खूप मोठा काळ लोटून इथपर्यंत आलो होतो.काय म्हणालात? लोटून! खरंच जेव्हा अशी एखादी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यातील २४तासातले २५ तास व्यापून घेण्याची क्षमता ठेवते. आणि अचानक एक दिवस कळते की त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण एक सेकंद ही व्यापु शकत नाही.त्यानंतर काळ लोटावाच लागतो. तर झालं असं की आज सकाळी तिचा मेसेज आला. मेसेज फक्त Hey..! इतकाच पण झालं असं की आजही माझ्या फोन मध्ये तिचा नंबर सेव्ह होता. अगदी जशास तसा स्क्रीनवर तिचे नाव (म्हणजे मी दिलेले नाव) दिसत होतं. मी ठरवलं तिला रिप्लाय नाही दयायचा.पण माझं हृदय नेहमी मेंदूवर हावी होत.अगदी आता झालं तसं. मी रिप्लाय केला - bol.
ती bolaycha hota thod.
मी bol kahi rahil ka mazyakade?
ती yek na..
मी तिला रिप्लाय नाही दिला. कारण तिचा ऐक ना..!! आल्यानंतर माझा बोल ना.!! हा मेसेज असायचा.आणि मला आज तो मेसेज करायचा नव्हता. त्यानंतर परत तिनेचं मेसेज केला.
Maz lagna tarla.
मी are waa.. abhinandan💐
ती tu khush aahes.
मी ka nahi?
ती seriously
मी ho.. karan tula visarnyasathi mala reason milal.
ती sorry.. plzz mala maaf kar. Mala nahi karaycha tuzya mitra sobat lagna.
मी maza mitra??
ती ho. Tuza mitra aditya tyachya sobat aahe maze lagna.
मी  are waah.. punha ekda abhinandan Would be Mrs. aditya.
त्यानंतर तीने मेसेज केला नाही आणि मी ती मेसेज करेल ही अपेक्षा ठेवली नाही.त्यानंतर मी मोबाईल हातात घेतला आणि तिचा नंबर वहिनी नावाने सेव्ह केला. आणि इतक्यावेळ लक्ष नसलेल्या TV कडे पाहिलं तर गाणे चालू होते.
'मेरे बाद किसको सताओ गे..
मुझे किस तरह से मिटाओ गे..
मुझको तो तौ बरबाद किया हैं
और कीसे बरबाद करोगे...

ये जो हलका हलका सुरुर हैं
ये तेरी नजर का कुसुर हैं...'

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?