रिमझिम गिरे सावन..
"तू आता अति करतो आहेस." ती जरा आवाज चढवुन बोलली. तस कॉफी-शॉप मधल्या सगळ्या नजरा आमच्याकडे वळल्या.
मी जरा विरमल्या सारखं खाली मान करत बोललो,"काय करतेस!सगळे बघत आहेत!"
ती,"मी सांगितलं का त्यांना! बघा माझा मित्र कसा निर्लज्ज आहे. एक तास उशिरा येऊन मलाच शिकवतोय."
आता माझा पारा चढू लागला होता,"आता! तू अति करतेस! मी तुला रिकामटेकडा वाटतो का?माझे सगळे काम करून मी तुला भेटायला आलो.तर मॅडम ला भांडायचे आहे!"
ती,"मी भांडत आहे? ठीक आहे मला बोलायचंच नाही तुझ्यासोबत."
मी,"तुझा प्रॉब्लेम काय आहे? विचित्र का वागत आहेस."
ती,"मी विचित्र वागत आहे.(आणि अचानक रडायला लागली)
मी,"हे बाई! इथे तमाशा नको करू.चल आपण बाहेर जाऊ!"
ती,"तुला तमाशा वाटत आहे हा!"
आता माझा संयम संपला आणि मी उठलो," तूझा मूड ठीक असला की बोलू आपण. बाय.! नीट जा घरी.आणि हो ही रिंग आणली होती तुझ्यासाठी.जर लग्नाला होकार असेल तर घाल."
ती फक्त बघत होती. आणि मी निघालो मागे एकदाही वळून न पाहता.
कॅफेच्या बाहेर आलो तर पाऊस सुरू होता. डोक्यात खूप राग होता.पण पावसाला पाहून,ऐकून,आणि अंगावर झेलून राग वाहून गेला. तसाच भिजत कार पर्यंत गेलो. कार काढली आणि मुख्य रस्त्याला लागल्यावर FM ऑन केला. कुठला कार्यक्रम चालू होता माहीत नाही. पण इतके नक्की की त्या RJ चा आवाज खूप गोड होता.म्हणून ती काय म्हणते ते ऐकत होता.तर तिच्याकडे एक गाण्याची request आणि मेसेज आला होता.पण नाव न सांगता मेसेज होता म्हणजे आपण म्हणतो ना! अनामिक तसला. 'I am Sorry! आणि हो रिंग मी घातली.'
या मेसेज ने माझे लक्ष केंद्रीत केलं न केलं तेच गाणं सुरू झालं,-
रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन ...
आणि माझ्या मोबाईल चा मेसेजटोन वाजला तर तिने रिंग घालून फोटो पाठवला होता. मी लगेच गाडी साईड ला घेऊन तिला व्हिडिओ कॉल केला. ती,"सॉरी.!"
मी(हसून)."इथेच तर चुकतेस तू!" ती काहीच बोलली नाही फक्त मान हलवली आणि आम्ही दोघे हसलो. आणि मी आणि ती दोघ एकसाथ गाणं म्हणायला लागलो.
महफ़िल में कैसे कह दें किसी से,
दिल बंध रहा है किस अजनबी से
हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन

-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा