विरहात खरोखरच जग वसते..
'आता भेटू शकतो का?' 'बोल ना.!' 'बरं ठीक आहे! आपण बाहेर भेटू.!' 'नाही तर जाऊदे.!' 'बरं.. ऐक ना.!! आपण शेवटच भेटू एकदा.' तिच्या मघापासून येणाऱ्या मेसेजला वाचत होतो. पण मी उत्तर देत नव्हतो. कारण तिच्या भावनांचा होणारा गोंधळ मी समजू शकत होतो. पण शेवटच भेटू हे शब्द मला अस्वस्थ करून गेले. लगेच फोन हातात घेतला आणि तिला कॉल केला. पहील्या रिंगमध्ये तिकडून आवाज आला. "हॅलो.! बोल ना." मी,"काय झालं?" ती,"आपण वेगळं होण्याचा निर्णय जितका समजूतदार पणे घेतला.तितकं सोपं नाहीये माझ्यासाठी तुला दूर करणं." मी(हसून),"हे तर माझ्यासाठी सुद्धा सोपं नाहीये.! आपण फोन चा वापर खूप कमी करायचो कारण माहीत होतं. आपण बोलत जरी नसलो तरी एकमेकांसाठी आहे.पण.." (मला मधेच तोडत पुढे ती बोलू लागली) ती,"पण आता जास्त गरज वाटत आहे एकमेकांच्या आधाराची." मी,"तू काय म्हणत होती मघाशी.?" ती,"आपण भेटूया का? शेवटचं!" मी,"हम्म.. ठीक आहे कुठे भेटायचं?" ती(आनंदाच्या स्वरात),"बाहेर भेटू.! नाही न...