पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेमाची लज्जत विरहात जास्त खुलते..

इमेज
तीन महिने... म्हणजे नव्वद दिवस.. म्हणजे एकवीसशे साठ तास.. असाच हिशेब मी तू दूर गेली तेव्हापासून ठेवतोय. तू माझ्यापासून दूर झाली. तेव्हापासून एक प्रश्न पडतो. दिवसामागून रात्र का येत असावी.??? दिवसभराच्या कटकटी,शीण एकमेकांच्या बाहुपाशात विरघळून टाकण्यासाठी.. निरव शांततेत अंतर्मनाच्या शंका ऐकण्यासाठी.. दिवसभराच्या सुखदुःखांची आपसात विभागणी करण्यासाठी.. रात्र आवश्यक असते. पण विरहाला मात्र रात्र हा फार मोठा शाप आहे. दिवसभर नाना कार्यात गुंतवलेलं मन रात्री पिसाट बनतं या विरहात..            आपण वेगळं झालो. तीन महिने झाले आणि आता रात्र काही सरेना. एक  एक क्षण.. कालचक्राची गती थांबली, अडून बसलेल्या बैलासारखी.! ज्या शय्येवर तू आणि मी एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध होऊन कित्येक रात्री जागवल्या, त्याच शय्येवर आता एकटाच.. या एकटेपणाची जाणीव.. त्या स्मृती... ते स्पर्श... ती आलिंगने... मनानं कसा बांध साहावा.!              असं म्हणतात की प्रेमाची लज्जत विरहात जास्त खुलते. पौर्णिमेच्या टिप...