प्रेमाची लज्जत विरहात जास्त खुलते..
तीन महिने...
म्हणजे नव्वद दिवस..
म्हणजे एकवीसशे साठ तास..
असाच हिशेब मी तू दूर गेली तेव्हापासून ठेवतोय. तू माझ्यापासून दूर झाली. तेव्हापासून एक प्रश्न पडतो. दिवसामागून रात्र का येत असावी.???
दिवसभराच्या कटकटी,शीण एकमेकांच्या बाहुपाशात विरघळून टाकण्यासाठी.. निरव शांततेत अंतर्मनाच्या शंका ऐकण्यासाठी.. दिवसभराच्या सुखदुःखांची आपसात विभागणी करण्यासाठी.. रात्र आवश्यक असते. पण विरहाला मात्र रात्र हा फार मोठा शाप आहे. दिवसभर नाना कार्यात गुंतवलेलं मन रात्री पिसाट बनतं या विरहात..
आपण वेगळं झालो. तीन महिने झाले आणि आता रात्र काही सरेना. एक एक क्षण.. कालचक्राची गती थांबली, अडून बसलेल्या बैलासारखी.! ज्या शय्येवर तू आणि मी एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध होऊन कित्येक रात्री जागवल्या, त्याच शय्येवर आता एकटाच.. या एकटेपणाची जाणीव.. त्या स्मृती... ते स्पर्श... ती आलिंगने... मनानं कसा बांध साहावा.!

असं म्हणतात की प्रेमाची लज्जत विरहात जास्त खुलते. पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याने सागरही चेकाळून उठतो... चंद्रमाला कवेत घ्यायला आकाशझेप घेऊ पहातो... विरहात त्याचे प्रेमपात्र काठोकाठ भरून वाहू लागले.. उसळ्या घेऊन घेऊन प्रेम जास्तच धुंद-फुंद बनते.. विकेकाचा.. विचारांचा अंकुश लावला तरी मदस्त्राव झाल्यासारखे ते बेफामच बनत असते.. दुधाची, मधाची, अमृताची गोडी,मद्याची मादकता साऱ्यांचा अर्क म्हणजे प्रियसी... अशा त्रैलोक्यातील गोडीची चटक लागलेलं मन.. शरीर थोडंच कुणाला ऐकणार... ते उसळणार.. उफाळणार...
हल्ली मला स्वप्न पडतात. खोलीत शय्येवर तू आहेस.. तुझ्या ओढीने मी आलो आहे.. सर्वत्र शांत आहे.. मी येतो.. आणि तुझ्या शेजारी.. अगदी जवळ येतो.. हातात हात भिडतात.. नजरेला नजर भिडते.. मनाला मन मिळते.. अंतर कमी होतं.. कमी होतं.. अंतर नाहीस होतं.. माझ्या बाहुच्या विळख्यात तू गुडमरतेस.. तुझ्या बाहुच्या स्पर्शाने मी धुंद होतो.. दोन टपोरे यौवनाचे भार स्पर्श करतात.. एक गोड.. अदभूत, कनाकलनीय शिरशिरी येते.. ओठ ओठांशी गुजगोष्ट करतात.. हात सर्वांगावरून फिरू लागतात.. दिवसभराची क्यांती लुप्त होते.. आणि.. आणि... छे, नको.. केवळ कल्पनाच.. नाही सहन होतं.. डोकं सुन्न होत, गात्र बधिर.. सर्व बंधन तुटून विखुरावी हे स्वप्न.. ही स्वप्ननगरी.. अशीच.. अशीच राहावी..!
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा