पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ढगाला लागली कळ..

इमेज
पाऊस.!! हा माझा आवडता विषय होता शाळेत असताना.नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर पाऊस आवडीचा विषय कधी जिव्हाळ्याचा झाला कळालचं नाही. पाऊस म्हणजे काय? तर समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती ढग तयार होतात आणि पाऊस बरसतो. हे झालं विज्ञानाच्या पुस्तकातलं उत्तर. पण तसं नसतं, पाऊस म्हटल की सर्वात अगोदर आपल्या डोक्यासमोर येत राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं गाणं,'प्यार हुआ इकरार हुआ हैं, प्यार से फिर क्यू डरता हैं दिल।' पाऊस म्हणजे काय.? तर मी मुद्दाम छत्री घरी विसरणे. तू दिसली मी मित्राच्या खांद्यावर हात ठेवून उगीच त्याला पटवून द्यायचं की छत्री कशी घरी राहिली! आणि मग तू जवळ येऊन काहीही न म्हणता छत्री माझ्या डोक्यावर धरायची आणि तिथे एकमेकांशी काहीही न बोलता चालू लागायचं. कॉलेजच्या गेटच्या थोडं पुढ आलं की तू नेहमीप्रमाणे विचारायचं,"आज छत्री विसरला? की मुद्दाम नाही आणली!" आणि मी फक्त तुझ्याकडे बघून डोळे मीचकवायचे. तू उगीच चिडायचं आणि थोडी दूर होत मला पावसात भिजवायची. आणि मनसोक्त हसून घ्यायचं. मी पण उगीच राग आल्याप्रमाणे काहीही न बोलता पुढे चालत राहायचं.तू सगळ्या र...

ब्रेकअप के बाद जिंदगी..

इमेज
'प्रेमात पडण्याआधीच, move on ची तयारी असावी.' मी या मताचा माणूस आहे. म्हणजे होतो. काय म्हणालात? अडखळलो मी? नाही हो.! अडखळलो कुठे.! ते तर आपलं असंच. पण खरं सांगू.! हो.! मी अडखळतो.! जेव्हा प्रेमाचा मुद्दा येतो. मी अडखळतो जेव्हा विरह येतो. त्यात दुःख, कोसळणं, कोलमडण असं काहीच नसतं. त्यात असतो हरवलेला सहवास.संपलेला संवाद.दुरावलेलं मन.आणि सावरलेले आपणं. प्रेमात माणूस पडतो. तर त्यातून बाहेर पडताना घडतो. काय.? त्याच कारण.? 'मी'पणा.! अहो.! खरचं भुवया काय उंचावता. जर तुमच्यात 'मी'पणा नसेल तर तुम्ही तिथेच गुटमळत राहणार.! आणि हे धोकादायक असतं. त्यामुळे त्यातून बाहेर पडा. कसं? त्या व्यक्तीला विसरून? नाही हो.! संशोधन सांगते की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं त्या व्यक्तीपासून दूर झाल्यावर,वेगळं झाल्यावर त्याच्या आठवणीतुन बाहेर येण्यासाठी( आठवणीतून बाहेर येण्यासाठी विसरण्यासाठी नव्हे) पूर्ण 30 वर्ष लागतात. म्हणजे माणसाच्या सरासरी आयुष्याच्या १/३ काळ हा आपण एखाद्या व्यक्तीला विसरण्यासाठी खर्च करतो पण हाती काय येत? निराशा. कसं असतं आपल्याला कितीही वाटलं मला त्...