ढगाला लागली कळ..

पाऊस.!!
हा माझा आवडता विषय होता शाळेत असताना.नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर पाऊस आवडीचा विषय कधी जिव्हाळ्याचा झाला कळालचं नाही.
पाऊस म्हणजे काय?
तर समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती ढग तयार होतात आणि पाऊस बरसतो. हे झालं विज्ञानाच्या पुस्तकातलं उत्तर.
पण तसं नसतं,
पाऊस म्हटल की सर्वात अगोदर आपल्या डोक्यासमोर येत राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं गाणं,'प्यार हुआ इकरार हुआ हैं, प्यार से फिर क्यू डरता हैं दिल।'
Image result for pyar hua
पाऊस म्हणजे काय.?
तर मी मुद्दाम छत्री घरी विसरणे. तू दिसली मी मित्राच्या खांद्यावर हात ठेवून उगीच त्याला पटवून द्यायचं की छत्री कशी घरी राहिली! आणि मग तू जवळ येऊन काहीही न म्हणता छत्री माझ्या डोक्यावर धरायची आणि तिथे एकमेकांशी काहीही न बोलता चालू लागायचं. कॉलेजच्या गेटच्या थोडं पुढ आलं की तू नेहमीप्रमाणे विचारायचं,"आज छत्री विसरला? की मुद्दाम नाही आणली!" आणि मी फक्त तुझ्याकडे बघून डोळे मीचकवायचे. तू उगीच चिडायचं आणि थोडी दूर होत मला पावसात भिजवायची. आणि मनसोक्त हसून घ्यायचं. मी पण उगीच राग आल्याप्रमाणे काहीही न बोलता पुढे चालत राहायचं.तू सगळ्या रस्त्याने मला "राग आला.! राग आला.!" विचारात चिडवत चालायचं.मग मला भिजवल्याचा बदला म्हणून मी रस्त्याच्या कडेला साचलेल्या डबक्यात उडी मारून तुझ्या अंगावर पाणी उडवायचं.आणि मग चिडलेली तू परत त्या पाण्यात उडी मारत ते पाणी उडवायचं. अस काहीस कॉलेज ते बस स्टॉप हे अंतर पार करायचं.मग बस स्टॉपच्या शेजारच्या टपरीजवळ गेलं की नेमकं तुला थंडी वाजायला लागणार.नि एक कप चहा घेतली की एक घोट पिला की तू कप अलगत माझ्या समोर धरणार.जरी मी चहा पित नसलो तरी पण तुझ्या ओठांचा स्पर्श झालेल्या कपातल्या चहाचा एक घोट मी पण घेणार. असं काहीसं असतं कॉलेजला जाणाऱ्याचा पाऊस.

Image result for maharashtra rain news rural area
पण आज..
राज्यात राज्यात अवकाळी पावसाने थैमान माजवला आहे.नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. शेतात उभ्या पिकाला कोंब फुटून आले. कापून ठेवलेले पीक पाण्याबरोबर वाहून गेले. अशा पावसात कोणता आनंद साजरा करावा. खरतरं पाऊस म्हणजे प्रेम, पाऊस म्हणजे सहवास, पाऊस म्हणजे आनंद पण सध्या पाऊस म्हणजे खरचं आनंद का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-बुद्धभूषण जाधव 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..