वफ़ा की हैं कहानियाँ..
दाराचा आवाज ऐकून त्याला कळलं. सायली रूममध्ये आलीये.त्याने डोळे बंद करून घेतले. ती त्याच्या बाजूला येऊन झोपली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलली,"रितेश,मला माहितीये तू झोपला नाही.! इकडं तोंड कर.!" त्याने ही काही एक न विचारता तिच्याकडे तोंड केलं. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी तिला पाहू लागला. तिचे ही डोळे भरून आले होते. सगळं काही हातातून निसटल ही जाणीव दोघांना खात होती. स्वतःला सावरत ती,"आजची रात्र तुझ्या मिठीत जगू दे.! उद्यापासून तुझ्यावर माझा अधिकार नसेल.!" त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला मिठीत घेतलं. खोलीत फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. अर्धा तास झाला. दोघ फक्त एकमेकांच्या स्पर्शाला साठवू पाहत होते. अचानक काहीतरी आठवल्यासारखं तो बोलला,"मला माफ करशील ना.!" ती,"कशासाठी?" तो,"अस काय करतेस! तुझ्यासोबत गेली ३वर्ष जे काही घडलं त्यासाठी आणि उदयानंतर जे घडेल त्यासाठी." ती,"माफी कशासाठी रे.! तू तर मला लग्नाच्या आधीच सगळं सांगितलं होतं. पण आपल्या दोघांचे हात फॅमिली ने बांधले होते. पण तू कायम प्रामाणिक होतास रे. स्वतःसोबत, ...