वफ़ा की हैं कहानियाँ..
दाराचा आवाज ऐकून त्याला कळलं. सायली रूममध्ये आलीये.त्याने डोळे बंद करून घेतले. ती त्याच्या बाजूला येऊन झोपली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलली,"रितेश,मला माहितीये तू झोपला नाही.! इकडं तोंड कर.!"
त्याने ही काही एक न विचारता तिच्याकडे तोंड केलं. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी तिला पाहू लागला. तिचे ही डोळे भरून आले होते. सगळं काही हातातून निसटल ही जाणीव दोघांना खात होती. स्वतःला सावरत ती,"आजची रात्र तुझ्या मिठीत जगू दे.! उद्यापासून तुझ्यावर माझा अधिकार नसेल.!"
त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला मिठीत घेतलं.

खोलीत फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. अर्धा तास झाला. दोघ फक्त एकमेकांच्या स्पर्शाला साठवू पाहत होते. अचानक काहीतरी आठवल्यासारखं तो बोलला,"मला माफ करशील ना.!"
ती,"कशासाठी?"
तो,"अस काय करतेस! तुझ्यासोबत गेली ३वर्ष जे काही घडलं त्यासाठी आणि उदयानंतर जे घडेल त्यासाठी."
ती,"माफी कशासाठी रे.! तू तर मला लग्नाच्या आधीच सगळं सांगितलं होतं. पण आपल्या दोघांचे हात फॅमिली ने बांधले होते. पण तू कायम प्रामाणिक होतास रे. स्वतःसोबत, माझ्यासोबत आणि तुझ्या प्रेमासोबत.!खरतरं मलाच अपराधी वाटत कधी कधी का म्हणून मी तेव्हा आज इतकी हिंमत नसेल केली."
तिला मधेच थांबवत तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो," चांगलंच झालं तुझ्यात हिंमत नव्हती ते. हिंमत असती तर तू माझी बायको नसती झाली. बरोबरीच नात काय असतं हे नसतं समजलं. स्वतःसाठी लढायचं असत हे मला कधीच कळाल नसतं."
ती(हसून) मिठी घट्ट करते आणि त्याला म्हणते,"तुला माहीत आहे. जगात मला कुणाचीच मिठी ही सुरक्षितता देऊ नाही शकणार जी सुरक्षितता आता आहे."
आता दोघही शांत झाले होते.पापण्यांची उघडझाप करण्यात सकाळ झाली. दोघ उठले तयारी केली. तिने त्याचे सगळे सामान दोन्ही बॅगमध्ये भरलं आणि "मी येते तू हो पुढं" म्हणाली. तो बॅग घेऊन कारमध्ये येऊन बसला होता. भावनांचा माजलेला काहूर त्याला अस्वस्थ करत होता.आयुष्यातून तिने जाऊ नये हे मन त्याला सारखं बजावत होतं.पण त्याला हे ही मान्य होतं की तिचं आयुष्य तो असं बरबाद नाही करू शकत. हे विचारचक्र आणि अश्रूंच्याधारा सोबत चालू होत्या. तिने गेट लावलं. गेटचा आवाज ऐकून तो भानावर आला. डोळे पुसून स्वतःला सावरलं. ती गाडीत बसली दोघ एकमेकांशी बोलत नव्हते. तिने Fm सुरू केला. गाणं सुरू झालं,
किसीका प्यार लेके तुम
नया जहाँ बसाओगे
किसीका प्यार लेके तुम
नया जहाँ बसाओगे
ये शाम जब भी आएगी
तुम हमको याद आओगे
अजीब दास्तां है ये...
आता तिने त्याच्याकडे पाहिलं. आणि हसली तो,"काय झालं?"
ती,"बरं वाटलं तू माझ्यासाठी राडलाच हे पाहून.!"
तो,"नाही, असं काही नाहीये मी नाही रडलो."
ती,"अच्छा.!तर हे शर्टवर पाऊस पडला म्हणायचं."
तो,"ते... चल कोर्ट आलं.!"
दोघही कोर्टाच्या पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर गेले. दोघांचे वकील आधीच हजर होते. १० मिनिटांनी त्यांना आत बोलावलं. संगन्मताने दोघांनी एकमेकांना विवाह नावाच्या बंधनातून मुक्त केलं होतं.कोर्ट रूमच्या बाहेर निघताना तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं.तर त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना. कारजवळ रितेश आधीच येऊन उभा होता. सायलीने पळत जाऊन त्याला मिठी मारली.त्यानेही मिठी घट्ट करत तिला मिस यू.! म्हटल.सक्षम दुरून फक्त दोघांना बघत होता. तिने सक्षमला जवळ बोलावलं. सक्षम चा हात रितेशच्या हातात देत,"जा सक्षम जा.! जी ले अपनी जिंदगी." आणि डोळा मारला. सक्षमने तिला मिठी मारली."I Love You सायली.!" तिनेही मिठी घट्ट करत स्वतःचे डोळे पुसले.रितेशने त्याच फ्लॅट आणि कार सायलीला दिली. तो रितेशच्या कारमध्ये बसून सायलीला बाय म्हणाला.
कार दिसेनाशी होईपर्यंत सायली हात हलवत होती. कार मध्ये fm ला गाणं सुरू होतं,
पुकारते हौ दूर से, वो क़ाफ़िले बहार के
बिखर गए हैं रंग से, किसीके इन्तज़ार के
लहर लहर के होंठ पर, वफ़ा की हैं कहानियाँ
सुना रहा है ये समा, सुनी सुनी सी दास्ताँ
फ़िज़ा भी है जवाँ जवाँ...
रितेशने सक्षमचा हात धरला,"Are You ok.!"
सक्षम,"हम्म.."
रितेश सक्षमच्या हाताला किस करत,"I Love You, Baby.!"
सक्षम,"I Love You Too.!"
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा