दिल तेरे बिना लगदा नहीं...





 Couple sleeping on a train - Buy this stock photo and explore ...

बरं ऐक सॉरी..!
खूप अवघड झालंय ना. पण काय करणार घरात तर बसावच लागेल.आपण मुंबईवरून औरंगाबादला येत होतो. तेव्हा तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफत.प्रश्न केला होतास,"तू मला मिस करशील ना.?"
आणि मी तेव्हा निरुत्तर होतो. कारण त्या क्षणाला मला खोटं बोलायचं नव्हतं. आणि खरं सांगायचं नव्हतं. पण आज पंधरा दिवसानंतर मी तुला खरं सांगणार आहे. "तुला राग येतो ना.! जेव्हा मी म्हणतो की मी तुझ्यासाठी परफेक्ट नाहीये." खरं सांगू.! मला आयुष्यात कधी परफेक्ट व्हायचं पण नाहीये. मला तुझ्यासोबत जग विसरून तो वेडेपणा अजून पंधरा वर्षांनी सुद्धा करायचा आहे जो आपण पंधरा वर्षांपूर्वी करत होतो.
तुला मी कायम म्हणतो नको करुस तो हट्टहास परफेक्ट बनण्याचा. नातं जितकं परफेक्ट होतं जात तितकं भावनाशून्य.आणि नात जपता जपता भावना जपायच्या राहून जातात.मला नाही माहीत तू माझ्याशी सहमत होशील किंवा नाही पण मला तू परफेक्ट नकोय वेंधळीच हवी आहे.जसं मुंबईवरून येतांना दाराला कुलूप लावून तीन वेळेस उघडून पाहिलं. एकदा काय तर खिडकी बंद करायची राहिली. दुसऱ्यांदा काय तर सिलेंडर बंद केलंच नाही अशी शंका आली. आणि तिसऱ्या वेळेस तू कहर केलास चक्क सामानाच्या बॅग आतमध्ये ठेवून दिल्यास. मी पूर्ण बिल्डिंग उतरून खाली येऊपर्यंत हसत होतो.आणि तू,"इतकं हसण्यासारखं काहीये त्यात." म्हणतं डोळे वटारून बघत होतीस. पण मला त्यादिवशी खात्री झाली की ही मुलगी माझ्या घराला जीव लागणार आहे.त्यामुळे ते परफेक्ट बनण्याच भूत काढुन ठाक डोक्यातुन. 
मला तू तशीच हवी आहेस. जशी समुद्रकिनारी गेल्यावर तुझ्या डिझायनर हिल खराब होतील म्हणून तू त्यांच्या दोऱ्या(सॉरी😂) एकमेकांमध्ये अडकवून माझ्या खांद्यावर ठेवून डोळे मीचकावत "इतकं चालत रे प्रेमात." आणि वडापाववाला दिसला की डायट विसरून दोन्ही हातात दोन वडापाव घेतेस आणि तिसरा वडापाव मला भरवायला लावतेस तेव्हा जीव ओवाळून टाकावा वाटतो.
म्हणून जशी आहेस तशीच रहा.
आणि हो काळजी घे. मला माहित आहे तुला पाळी आलीये. आणि माझ्याइतक तुझ्या पाळीला कोणी मिरवणार नाही.फार फार तर तुला वेगळं बसवतील. आणि खायला हातात मिळेल.पण तुला ते नको असतं मला माहित आहे. तुला पाळी आली की मुद्दाम कांदेभजे खायचे असतात अगदी स्वतःच्या हाताने बनवून.तुला खूप सारे चॉकलेट खायचे असतात अगदी तोंड गाल नाक भरे पर्यंत.
 Boyfriend Girlfriend Lap Lying Stock Photos - Download 136 Royalty ...
तुला माझ्या मिठीत येऊन विनाकारण माझ्या हातांच्या बोटाशी खेळायचं असतं. पण Don't worry.! पुढच्यावेळी सगळी कसर भरून काढू. अगदी ते फ्रीजमध्ये ठेवायला जागा नसेल इतके चॉकलेट घेऊन येईल.आणि हो.! मिस करतो की नाही माहीत नाही. पण इतकं मात्र खरं की आपण दोघंही परफेक्ट नाहीये. पण सोबत असलो की आपलं परफेक्ट नसणचं आपल्याला पूर्ण करत. याची जाणीव गेल्या पंधरा दिवसात झालीये.
अगदी या गाण्यासारखं झालंय.,
दिल तेरे बिना लगदा नहीं
दिल हथों बाहर हो गया
इश्क़ तेरा इश्क़ मैनु सोन ना देवे
इश्क़ तेरा इश्क़ मैनु रोन ना देवे 

- बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

  1. अतिशय उत्तम प्रकारे व्यक्त झालास👍..सगळीकडे काहीस तुझ्यासारखेच इतरांचे हाल झालेले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. काही क्षण आपल्या आयुष्यातले आज इथे परत जगायला मिळाले

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?