अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..
काल बातमी आली. सुशांतने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं प्रमुख कारण नैराश्य आहे असं बोललं जातंय. त्यानंतर जिकडे तिकडे मानसोपचार तज्ञ दिसू लागले. जो तो व्यक्त व्हा.. व्यक्त व्हा.. म्हणत सुटला. पण खरचं हे व्यक्त होणं उपयोगाच असतं का? आणि असलं तरी ज्याच्याजवळ व्यक्त होतो तो तितका प्रगल्भ असेल का? कारण आपण बऱ्याचदा म्हणतो की लोकांना तुमच्या कमजोरी सांगू नका. ते गैरफायदा घेतील. मग का म्हणून व्यक्त व्हावं.? समाजात वावरताना जे नातेसंबंध असतात ना.! ते सगळे सगळे कृत्रिम आहेत. मानवनिर्मित आहेत. निसर्गाने तुम्हाला मातीच शरीर दिललं तितकंच काय ते आपलं असत. त्यामुळे एकटेपणातून नैराश्य येते हा समज मुळात चुकीचा आहे.मध्यंतरी स्त्री-पुरुष संबंध या विषयाचा अभ्यास करत असताना मलिका अमर शेख त्यांचा एक लेख माझ्या वाचण्यात आलेला. त्यात त्या म्हणतात,'मानवी एकाकीपणा हा हिंस्र, पाशवी, आणि अजस्त्र असतो. पण तो तितकाच सुखद, हळुवार आणि तलम असतो. एकाकीपणा असह्य, अटल असला तरीही त्याइतकी सुरक्षितता दुसऱ्या कोणत्याच मानवी व्यक्तिमत्त्वात असत नाही.' आणि मला हे खूप गरजेचं वाटत की आपण एकाकीपणा पासून का पळ काढ...