अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

काल बातमी आली. सुशांतने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं प्रमुख कारण नैराश्य आहे असं बोललं जातंय. त्यानंतर जिकडे तिकडे मानसोपचार तज्ञ दिसू लागले. जो तो व्यक्त व्हा.. व्यक्त व्हा.. म्हणत सुटला. पण खरचं हे व्यक्त होणं उपयोगाच असतं का? आणि असलं तरी ज्याच्याजवळ व्यक्त होतो तो तितका प्रगल्भ असेल का? कारण आपण बऱ्याचदा म्हणतो की लोकांना तुमच्या कमजोरी सांगू नका. ते गैरफायदा घेतील. मग का म्हणून व्यक्त व्हावं.?
समाजात वावरताना जे नातेसंबंध असतात ना.! ते सगळे सगळे कृत्रिम आहेत. मानवनिर्मित आहेत. निसर्गाने तुम्हाला मातीच शरीर दिललं तितकंच काय ते आपलं असत. त्यामुळे एकटेपणातून नैराश्य येते हा समज मुळात चुकीचा आहे.मध्यंतरी स्त्री-पुरुष संबंध या विषयाचा अभ्यास करत असताना मलिका अमर शेख त्यांचा एक लेख माझ्या वाचण्यात आलेला. त्यात त्या म्हणतात,'मानवी एकाकीपणा हा हिंस्र, पाशवी, आणि अजस्त्र असतो. पण तो तितकाच सुखद, हळुवार आणि तलम असतो. एकाकीपणा असह्य, अटल असला तरीही त्याइतकी सुरक्षितता दुसऱ्या कोणत्याच मानवी व्यक्तिमत्त्वात असत नाही.' आणि मला हे खूप गरजेचं वाटत की आपण एकाकीपणा पासून का पळ काढतो याच उत्तर मिळत नसेल तर आपण आधार का शोधतो याच तरी किमान उत्तर आपल्याकडे असावं. त्याच लेखात त्या म्हणतात,'प्रत्येक आधार हा शाश्वत आणि कायमचा दीर्घ असतो असा समज करून घेणे हा मुर्खपणाच असतो.'

काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल दिला होता. त्यात त्यांनी अस नमूद केलं होतं की, जगात मृत्यूच्या कारणांमध्ये कॅन्सर आणि हृदयरोग हे दोन प्रमुख कारण असले तरी 2020 साली डिप्रेशन आणि नैराश्यामुळे मरण पावणाऱ्यांशी संख्या सर्वात जास्त असेल.
जगातलं सर्वात जास्त आत्महत्येचं प्रमाण कुठे जास्त असेल तर हे हंगेरी मध्ये. जवळपास दर लाख लोकांमागे 40 असा आकडा आहे. आणि भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतात सर्वात जास्त आत्महत्या पश्चिम बंगाल मध्ये होतात. आणि शहरांचा विचार करायचा झाल्यास चेन्नई, मुंबई आणि दिल्ली असे क्रमशः येतात.
बर हे आत्महत्या आणि नैराश्य इतके का वाढत असेल.? तर त्याच उत्तर आहे जागतिकरणामुळे बदललेली आपली जीवनशैली. चंगळवाद हा आजच्या घडीला परवलीचा शब्द झाला आहे. अनेक सर्वेक्षणातून संशोधक असे म्हणतात की, जे लोक संपत्ती, समाजातील स्थान आणि चंगळवादी गोष्टींना प्राधान्य देतात, ते जास्त डिप्रेस्ड असतात. माणसाच्या डोक्यात चंगळवादी दृष्टीकोन डोकावला कि त्याचा नकारात्मक परिणाम होतो. हे दाखविण्यासाठी 'Psychological Science' या नियतकालिकाने एक प्रयोग केला. यांतल्या लोकांना दोन प्रकारच्या प्रतिमा दाखवल्या. त्यातल्या एका प्रतिमेत फक्त माणंस होती.तर दुसऱ्या प्रतिमेमध्ये हिरे,दागिने,गाड्या,इलेक्ट्रोनिक वस्तू. त्या ग्रुपमधल्या ज्या माणसाचे लक्ष हिरे, गाड्या या वस्तूंवर जास्त खिळलेल होतं, त्यांना तेव्हाच्या चाचणीत डिप्रेशन आणि चिंता जास्त सतावत होती.ते इतरांपेक्षा जास्त एकाकी आणि स्पर्धात्मक प्रवृत्तीचे होते असं दिसून आल. टी.व्ही. वर ज्या चैनीच्या वस्तुंच्या जाहीराती दाखवल्या जातात, त्या पाहून त्या वस्तू आपल्याला परवडत नाहीत हे लक्षात आल्यान अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे टी.व्ही. बघणं कमी केलं, तरी डिप्रेशनचं प्रमाण कमी होईल असं मत संशोधक व्यक्त करतात.आणि दुसरं सर्वात महत्त्वाच एखाद्याच्या जन्माचं आनंद आणि मृत्यूचा शोक(दुःख) ग्लोरिफाय करण्यापेक्षा जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान असलेली अंधुक संवादाची रेष घट्ट करू.. जमलं तर..😊
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा