तेरे इश्क दी फ़कीरी..


ऑफिसमधून मेल आला 10 दिवसात पुन्हा कामावर रुजू व्हा.! मेल बघुन सगळ्यात आधी तोंडात शिवी आली होती. यासाठी नाही की कामाचा कंटाळा आला होता. यासाठी की खूप सगळ्या फॉर्मलिटी करून यायला सांगितलं. तितक्यात तिचा कॉल आला.."ऐक ना.! मला परत मुंबईला जावं लागेल. सकाळी मेल आला ऑफिसमधून.!"
मी, "मला पण आलाय!"
आणि दुसऱ्याच क्षणाला दोघांच्या तोंडातून हुश्श... एकसाथ निघालं. दोघ हसायला लागलो. सगळ्या फॉर्मलिटी करण्यात 4 दिवस गेले.रात्री प्रवासाला सुरुवात केली.गाडी औरंगाबादच्या बाहेर पडत निघाली तसं मी आठवणींच्या गाठोड्याला उघडून बसलो.सोबत प्रत्येक क्षण मोजत होतो.कधी एकदा तिला भेटतो नि घट्ट मिठी मारतो अस झालं होतं.
२०१७ ला ती मुंबईत आली होती. म्हणजे मीही तेव्हाच आलो पण ती माझ्यानंतर सहा महिन्यांनी. मुंबईत दोन महिने working women हॉस्टेल ला राहिल्यानंतर तिचं असं झाल,'बस्स.. आता नाही राहू शकत इथे..!' खूप प्रयत्न केले पण कोणी घर द्यायला तयार होईना. शेवटी ठरलं. ती माझ्यासोबत राहणार.. माझा स्वतःचा फ्लॅट असल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही हे अस वाटत होतं. सुरुवात खूप रोमॅंटिक झाली होती.
5 Ways to Make your Bedroom Ready for “Cuddle Weather”
एकमेकांच्या बाहुपाशात रात्र रात्र जागायच्या. शब्दांचा संवाद नसला तरी खोलीतल्या मंद प्रकाशात एकमेकांच्या स्पर्शाने असंख्य संवाद व्हायचा. पण हळूहळू सगळं बदलू लागलं. आता तो रोमान्स उडून गेला होता. माझं खूप जास्त Particular असणं नि तिचं त्यापेक्षा जास्त वेंधळ असणं. याचा एकमेकांना त्रास होत होता. कुरकुरीत पाच महिने काढल्यानंतर एका रात्री भांडण झाल म्हणून सगळं समान उचलून ती घराच्या बाहेर पडली. मी रागात होतो.ती गेली.. मी तसाच.. दोन तास सोफ्यावर बसून होतो. समोरच Ashtray मध्ये तिच्या दोन अर्धवट विझलेल्या सिगारेट दिसल्या. त्या सिगारेटवर तिच्या लिपस्टीकचा मार्क बघून हसू आलं. आणि मोबाईल हातात घेतला. चार वाजले होते. आता रागाची जागा काळजीने घेतली तसाच उठलो नि गाडीची चावी घेऊन तिला घ्यायला गेलो. तिथे गेलो तर मॅडम यायला काही तयार नव्हत्या. मी बळजबरीने हात धरुन आणलं होतं.
आता अडीच वर्षांनंतर माग वळून पाहिलं की दोघ ही हसतो. आता मी थोडा वेंधळा झालोय तर ती थोडी Particular.. एकमेकांमध्ये इतकं गुंतून जाऊ असं कधीच वाटलं नव्हतं. अडीच वर्षात आम्ही पहिल्यांदाच एकमेकांपासून इतकं दूर राहिलो होतो.
झोप कधी लागली कळालंच नाही. कोणीतरी हलवून उठवलं. सर तुमचा स्टॉप आलाय.मी डोळे चोळत बाहेर पाहिलं तर ती कार घेऊन उभीच होती.तिला पाहून झोप कुठे पळाली कळालंच नाही. पटपट सगळ्या बॅग उचलल्या नि खाली उतरलो. तिने मला पाहून डोळे मिचकवले. खरतर तिला मुद्दाम सगळ्यांसमोर ओठांचा चंबू करून किस करायचं असत.पण मास्क लावल्यामुळे आता नवीन शोधलं होत. समान कार मध्ये टाकून. पोरीने सॅनिटायझर ने मला अंघोळ घातली नि घट्ट मिठी मारली.मी मिठी घट्ट करत," घरी जायचं की इथेच करायचं.!" ती,"चालेल तस ही मास्क आहे कोणाला कळणार नाही.!" आणि दोघ हसायला लागलो. ती कार चालवत होती नि तिला डोळे भरून बघत होतो.ती, "असं का बघत आहे तू.?" मी, "82 दिवसानंतर बघत आहे ना.!"
ती, "हम्म.. 82 दिवस... म्हणजे एक हजार नऊशे अडूसष्ठ तास.."
मी, "येस... एक लाख अठरा हजार ऐंशी मिनिटं.!"
ती, "ओह्ह हो.. सात लाख चौऱ्यांशी हजार आठशे सेकंद.!"
मी, "I miss You So Much..!"
ती, "me Too.!" आणि पुन्हा डोळे मिचकवले..
Holding hands stock photo 5faef5ce-ad1c-4a3f-b412-a184dedba766
मी(तिचा हात हातात घेत),"I love You मेरी जान..❣️"
ती,"खूप जास्त उतू नाही आलं आज..? Anyway.! Love You Too जान..❣️"
गाडीत गाणं चालू होतं,
ओ रे दिलजानियां जिन्द मेरी तुझसे
तेरे सहारे सांस है मेरी
बादल जैसा प्यारा है तेरा
सागर जैसी प्यास है मेरी
चढ़ गयी मैनू तेरे इश्क दी फ़कीरी
तेरी गलियों में मेरा दिल लग्दा
नित खैर मंगा....


-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

  1. आता तो थोडा वेंधळा झालाय आणि ती थोडी particular 🙌🙌

    उत्तर द्याहटवा
  2. वाह... उत्तम मुड बसला आहे... सध्याच्या परिस्थितीत उतू आलंय मस्त, खूप आवडलं �� रोमान्स ते आठवणींचा आणि आठवणीतून नव्या सुरुवातीचा प्रवास ��

    उत्तर द्याहटवा
  3. खूप अप्रतिम लिखाण साहेब💐💐💐👌👌👌

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

मी नग्न पाहिलं तिला..