तुला कसं सांगु...
तुला कसं सांगु .... तुला कसं सांगु, तुझ्या असण्याने मला फरक पडतो . रखरखत्या उन्हात , तुझ्या केसांची सावली मला सुखावून जाते. तुला कसं सांगु , तुझ्या असण्याने मला फरक पडतो. तुझ्या गालावरची खळी आणि त्यावर तोऱ्यात डुलणारी केसांची बट , मला नव्याने प्रेमात पाडते . तुला कसा सांगु , तुझ्या असण्याने मला फरक पडतो. माझ्या हास्यामागील दुःख क्षणात ओळखणारी तू, मला प्राणापेक्षा प्रिय आहे. पण हे सांगण्यात, माझा पुरुषी अहंकार मध्ये येतो. तुला कस सांगु, तुझ्या असण्याने मला फरक पडतो. - बुद्धभूषण जाधव