प्रेम...

प्रेम ... 

 प्रेमात पडणे हा शब्द मला मुळीच पटत नाही . व्यक्ती हा प्रेमात घडत असतो ,स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असतो. प्रेमात आपल्याला आपल्या जोडीदारासमोर स्वतःला वेगळे दाखवण्याची गरज नसते. प्रेमात आपण जसे आहोत तसे व्यक्त होत असतो यात कुठलाही दिखाऊपणा  नसतो. आपण जसे आहोत तसे त्या व्यक्तीला आवडलेलो  असतो. 
प्रेमात (मैत्रीत) Sorry,Thank YOu,Please म्हणायचे नाही असे प्रेमपंडित सलमान खान म्हणतात . पण खरं तर याचा नात्यात आपण सॉरी ,थँक्स  म्हणायला सुरुवात करावी कारण हे नातं सर्व नात्यापेक्षा निर्मल आणि पवित्र असते . प्रेमात माणूस दुसऱ्याच्या मताला ऐकून घेण्याची क्षमता विकसित करतो. समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची त्याला जाणीव होते. 
आज हि आपल्या समाजात प्रेमाला चूक,पाप,वैगेरे वैगेरे नाव देऊन समाजाचे ठेकेदार मोकळे होतात. आपल्याकडे प्रेम या शब्दा पेक्षा लफडं हा शब्द जास्त प्रचलित आहे. कोणते तरी शायर त्यांच्या शायरीमध्ये म्हणतात  कि ,
किसी के दिल मे बसना बुरा तो नहीं .. 
किसी के दिल में बसना खता तो नहीं ... 
गुमराह  हैं ... 
ये जमाने की नजर मैं ,
तो क्या हुआ... 
जमाने वाले  भी इन्सान है, खुदा तो नहीं .. 


-बुद्धभूषण जाधव 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..