आयुष्य...
आयुष्य.....
मरताना वाटलं आयुष्य
नुसतंच वाहुन गेलं
मला जगायचं ,जगायचं म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं !
आयुष्याच्या शेवटी असं वाटणार नाही
इतकं 'मस्त ' जगा !
छान वाटलं वाचायला पण मनात आला खरंच आपण आयुष्य जगतो का ? प्रत्येक व्यक्तीची जगण्याची व्याख्या वेगळी असते. पण आयुष्य तर सारख्याच नात्यात विणलेला असता ना,आपण कोणाचा तरी मुलगा,भाऊ,मित्र ,अशा विविध नात्यात असतो. मग जगणेच कसे विसरून जातो .
एकदा जगाला विसरून मनसोक्त हसून बघा . काळजात दडलेलं दुःखाला डोळ्यातील अश्रूतुन वाट करून द्या. का जगणे कळण्यासाठी पासून मरणाची वाट पाहतो ? आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मनावरचा ओझं बाजूला ठेवून आपल्या माणसाबरोबर हसा,रडा ,त्यांना वेळ द्या . मग बघा आयुष्य किती सुंदर होईल.
- बुद्धभूषण जाधव
छान 👌👌
उत्तर द्याहटवाmast
उत्तर द्याहटवाkeep it up