भिंत...
भिंत...
अंधारात भिंतीशी बोलून,
मन मोकळे होते.
भिंतीला कान असले
तरी तोंड नसते.
म्हणून तर भिंतीची
साथ प्रत्येकाला असते.
माणसाप्रमाणे रंग बदलणं
भिंत अजून शिकली नाही.
सर्व गोष्टी ठाऊक असताना
तत्वज्ञान पाजळत नाही.
माणूस आयुष्यभर धडपडतो
डोक्यावर छत असावं म्हणून,
छतालाही भिंतीचाच आधार
हे नेहमीच विसरतो माणूस.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा