सुख म्हणजे नक्की काय असतं...

     सुख आयुष्यात कोणाला नको असतं! सुख हे मानण्यात असतं, दाखवण्यात नाही. सुखाची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते हे वेगळं. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. काहीजणांचे सुख पैसे कमवण्यात तर काहींचे माणसे जोडण्यात आणि हो हल्ली तर सोशल साइड वर किती लाईक मिळाले यातही आहे बरं का!
    कधी कधी वाटतं सुखाला आपण मृगजळ तर समजत नाही ना? कारण सुख समोर असलतरी आपण त्यापेक्षा मोठया सुखाची वाट पाहतो(जे कि आपल्या दृष्टीने मोठे असत). आपण मोठ्या सुखाच्या मागे इतक्या वेगाने धावतो की आपल्याला वाटेतील छोटे छोटे सुख दिसतं नाही. जर आपण छोटे छोटे सुख जमा करत पुढे गेलो तर कदाचित आपल्या झोळीत मोठया सुखापेक्षा जास्त सुख असेल.खरं सांगायचं तर सुख हे छोट्या गोष्टीतच असतं. तुम्ही आवडती गाणे ऐका तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान असेल. कधी तरी कुटुंबासोबत आपल्या माणसासोबत निवांत गप्पा मारा(मोबाईल बंद करून) समाधान वाटेल. सुख म्हणजे काय तर ते अंतरीचे समाधान असते.

-बुद्धभूषण जाधव
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?