वो यार हैं जो खुशबू की तरह..
वो यार हैं जो खुशबू की तरह, हैं जिसकी जुबा उर्दू की तरह. 'दिल से..' या चित्रपटातील गुलजार यांनीच लिहलेल्या ओळीनेच त्याचे वर्णन करता येईल.असा दिल से सहप्रवासी.सहप्रवासी म्हटले तरीही हा काही आपल्याला कळला आहे असे वाटत नाही.गुलजार हे भारतीय चित्रपट सृष्टीला लाभलेला 'कोहिनूर' हिरा.म्हणजे बघा ना.! चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन, गीतकार आणि पटकथा लेखन.असा शब्दावर अधिराज्य गाजवणारा संवेदनशील मनाचा कवी आज वयाच्या ८४ पर्यंत येऊन पोहोचला.त्यांच्या लिखाणाची शैली आपल्या सारख्या सामान्य माणसाला समजणे सोपी असली तरी जाणून घेणे अवघड आहे.म्हणजे हेच बघा ना.! स्वतःच्या जन्मतारखेचा उल्लेख करताना ते 'प्लूटो' या त्यांच्या २०१४ साली आलेल्या कवितासंग्रहातील 'पहचान' या कवितेतून व्यक्त होतात. - मेरी चेसिस की तारीख अट्ठारह अगस्त उन्निस सौ चौतीस हैं।' मोटरगाड्यांच्या 'चासिस' हा एक महत्त्वाचा भाग आहे.हा चासिस नंबर गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचा आवश्यक घटक आहे.या चासिसवर त्या गाडीची उत्पादनाची तारीख दिलेली असते.चोखंदळ आणि जागरूक ग्राहक ती नीट तपासून गाडी...