वो यार हैं जो खुशबू की तरह..

Image result for gulzar shayri hd pics for blog
वो यार हैं जो खुशबू की तरह,
हैं जिसकी जुबा उर्दू की तरह.
        'दिल से..' या चित्रपटातील गुलजार यांनीच लिहलेल्या ओळीनेच त्याचे वर्णन करता येईल.असा दिल से सहप्रवासी.सहप्रवासी म्हटले तरीही हा काही आपल्याला कळला आहे असे वाटत नाही.गुलजार हे भारतीय चित्रपट सृष्टीला लाभलेला 'कोहिनूर' हिरा.म्हणजे बघा ना.! चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन, गीतकार आणि पटकथा लेखन.असा शब्दावर अधिराज्य गाजवणारा संवेदनशील मनाचा कवी आज वयाच्या ८४ पर्यंत येऊन पोहोचला.त्यांच्या लिखाणाची शैली आपल्या सारख्या सामान्य माणसाला समजणे सोपी असली तरी जाणून घेणे अवघड आहे.म्हणजे हेच बघा ना.! स्वतःच्या जन्मतारखेचा उल्लेख करताना ते 'प्लूटो' या त्यांच्या २०१४ साली आलेल्या कवितासंग्रहातील 'पहचान' या कवितेतून व्यक्त होतात. -
मेरी चेसिस की तारीख
अट्ठारह अगस्त उन्निस सौ चौतीस हैं।'
मोटरगाड्यांच्या 'चासिस' हा एक महत्त्वाचा भाग आहे.हा चासिस नंबर गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचा आवश्यक घटक आहे.या चासिसवर त्या गाडीची उत्पादनाची तारीख दिलेली असते.चोखंदळ आणि जागरूक ग्राहक ती नीट तपासून गाडीच्या खरेदीबाबत निर्णय घेतात.(चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी गुलजार एका गॅरेज मध्ये काम करायचे म्हणून कदाचित जन्मतारीखेचा दाखला चासिस नंबरशी जोडला असावा.)
          एका वर्षाची तुलना दारुच्या बाटलीशी करताना वर्षभर घोट-घोट पीत संपूर्ण बाटली संपविली की अशी सुरुवात करीत चार ओळीच्या कवितेत शेवटच्या दोन ओळीत या वर्षांनी काय दिले ते सांगताना म्हणतात.
.....तल्ख ज्यादा,तेजाबी और आतिशी कमरे
होंट अभी तक चलते हैं।
वाढदिवस हा आनंदाचा क्षण जरी असला तरी एका टप्प्यानंतर तो स्वतःच्या उतारपणाची जाणीव करून देऊ लागतोच.१८ऑगस्ट२०१५ ला स्वतःच्या ८१ वर्षे पूर्ण करणाऱ्या गुलजार साहेबाच्या भंवर-सी घूमती हैं..  वाचत असताना एकीकडे मन कातर होते आणि त्याचवेळी एक भावमग्र कविता वाचल्याचं समाधान मिळते.'भोवऱ्यासारखी गरगर फिरण्याची सवय असणाऱ्या पृथ्वीला थांबवून मला कुठपर्यंत घेऊन जाणार आहेस असं तिला विचारावसं गुलजार यांना वाटते.

'भंवर के दायरे गर फैल रहे हैं,
तो फिर साहील कहाँ होगा?
सिमटता जा रहा हैं दायरा,
तो उम्र का मर्कज कहाँ पर हैं?'
          गुलजार यांचे खरे सम्पूर्ण सिंग आहे.किती संपूर्णपणे हा माणूस आपल्या भावभावनांना व्यापून उरला आहे हे लक्षात आले की माणसाने आपले खरे नाव किती सार्थ केले आहे असे वाटायला लागते.गुलजार या हिंदी शब्दाचा मराठी अर्थ समृद्ध किंवा संपन्न होतो.गुलजार मला नेहमी सुगंध जाणवावा पण हाती काही लागू नाही असाच अनुभव वारंवार करून देतात.
Image result for gulzar shayri hd pics for blog
          गुलजार यांच्या कवितेचं वैशिष्ट्यचं हे आहे की,त्यांना नेमकं काय वाटतं हे ते किंचितच सांगतात.ती शब्दाची संदिग्धता नाही तर ती विभ्रमाची समृद्धता आहे.वाचकांना त्यांच्या त्यांच्या अनुभवाच्या कात्रज घाटात सोडून देण्याचे काम त्यांच्या कवितेने एकदा केले की गुलजार यांना स्वतःलाच आनंद होत असावा.
गुलजार हे गारुड गेली कित्येक वर्ष माझ्या डोक्यावर सवार आहे.आणि तो माझ्यासाठी अतिशय खुशीचा मामला असल्यामुळे त्यातून सुटका काहीच नकोय.अशा जुन्या आणि नव्या या दोन्हीला समन्यायी असा हा आपल्या भावविश्वाचा सहप्रवासी म्हणजे गुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो हीच इच्छा.!!
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?