तो, ती आणि मैत्री..
'समाजाची होणारी प्रगती आणि समाज मनाची होणारी प्रगती.' या वाक्यात जरी किंचित फरक असला तरी त्या वाक्याचा आशय खूप वेगवेगळा आहे. आज जागतिक मैत्री दिन.! म्हणजे मैत्रीचा दिवस तसा विचार केल्यास मैत्रीचा असा कोणता दिवस असूच शकत नाही. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे (असं शाळेत शिकलो. कारण शाळेत शिकलेल्या बऱ्याच गोष्टी योग्य असल्या तरी समाजात वावरताना अयोग्यच ठरतात).आणि समाजशील प्राणी हा फक्त आई-वडील, भाऊ,बहीण,आजी-आजोबा, काका-काकू, नवरा-बायको या कक्षेत मर्यादित राहत नाही. माणसाला जन्मतःच काही रक्ताचे नाते मिळतात तर काही नाते आपल्याला बनवावे लागतात. अशा नात्यांना मैत्री म्हणतो.
तर आज friendship day चे सकाळ पासून खूप मेसेज आले. Social side's वर सकाळ पासून मित्र-मैत्रिणींचे फोटो टाकून शुभेच्या देण्याची नवी प्रथा सुरू झालीय.छान वाटलं की आपला समाज मुलगा आणि मुलगी यांच्या मैत्रीला निखळ मैत्री पर्यंत घेऊन आलाय.
नाहीतर १९८९ मध्ये एक सिनेमा आला. सिनेमा इतका काही लोकांच्या मनात घर करून गेला की.समाजाला त्या सिनेमातील जादुई संवादातून बाहेर पडायला २५ वर्षाचा अवधी लागला.डायलॉग होता 'एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते.' म्हणजे बघा मुलगा आणि मुलगी यांची मैत्री कधीच असू शकत नाही का? स्त्री आणि पुरुष हे निसर्गाने निर्माण केलेले दोन घटक आहे ज्याच्या एकत्र येण्याने नवीन जीव जन्माला येतो. अरे हो.! पण काय प्रत्येक वेळी हेच कारण असतं!मानसिक आधार ही तितकाच महत्वाचा असतो.मग काय फरक पडतो की हा आधार स्त्री ने पुरुषाला दिला की पुरुषाने स्त्री ला दिला.
त्याच सिनेमातील दुसरं वाक्य (वाक्य काय! हे तर जणू ब्रीदवाक्यचं झालं आहे) 'दोस्ती में No Sorry, No Thankyou.!' माहीत नाही या सिनेमाने किती नाते खराब केले असतील. माहीती असत माझ एक सॉरी म्हणण्याने आपली मैत्री टिकेल.(पण सॉरी का म्हणायचं? कारण सलमान बाबा ने सांगितलं आहे,'Sorry म्हणायचं पण नाही आणि thankyou पण म्हणायचं नाही') मला असं वाटत Sorry! Thankyou!असे शब्द मैत्रीत असायला हवेत. कारण आपण आपल्या जन्मापासून मृत्यू पर्यंत खूप मित्र कमावतो. आणि कुठलंही नात टिकवण्यासाठी आदर हा गरजेचा असतो. जर तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा आदर केला तर नक्कीच ते नात दीर्घ काळापर्यंत टीकेल(अगदी सलमान च्या तारुण्यासारखं😂).
अरे हो.! अजून एक डायलॉग 'दोस्ती की हैं निभानी तो पडेगी.!' म्हणजे तुम्ही कोणावर उपकार करत आहात मैत्रीकरून! स्वतःवर की तुमच्या मित्र-मैत्रिणीवर.
अनुराग बासूचा बर्फी कुठेतरी या चौकटी मोडून मोकळा श्वास घेतांना दिसला. तिथे मैत्रीचे बंध दाखवण्यासाठी कुठल्याही डायलॉग चा आधार नव्हता. तिथे होती फक्त संवेदनशीलता.तुम्ही किती संवेदनशील आहेत याचे मोजमाप नव्हते. ते फक्त आपण ठरवायचं होतं. सिनेमाघरातून बाहेर जातांना काय घेऊन जायचं आणि काय सोडून जायचं.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा