माझा आवडता प्राणी - वाघ

Image result for avni tiger
           माझा आवडता प्राणी वाघ आहे. वाघाचे माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. आजही काही शेकड्यांनी वाघ आपल्याकडे शिल्लक आहे.जगातील एकूण वाघातील पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत. वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे.वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे.लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात.वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतीक आहे.
           वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्ग चक्र बिघडून जाईल वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड आणि जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा अनुभव आहे.
             मी शाळेत असताना असा निबंध लिहला होता. तेव्हा अभिमान वाटायचा. की व्याघ्र संवर्धनात आपला देश इतकं मोठं काम करत आहे. पण आता स्वतःची लाज वाटत आहे की आपण आपल्या देशात असे सरकार प्रस्थापित केले आहे जे मूठभर लोकांच्या फायद्यासाठी माणुसकी शुन्य कृत्य करतात.अवनीच्या हत्येमुळे नक्कीच प्राणिप्रेमी आणि संवेदनशील मनाच्या माणसामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Image result for avni tiger
            अवनी नावाच्या पाच वर्षाच्या वाघीणीची हत्या झाली. का? तर ती वाघीण नरभक्षक होती असे म्हटले जात आहे. पण हळूहळू आता गौप्यस्फोट होताना दिसत आहे.
माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नियमानुसार सूर्यास्तानंतर कुठल्याही प्राण्याला बेशुद्ध करता येत नाही.मग अवनीला का बरं गोळ्या झाडून मारण्यात आहे. ते ही अशा वेळेला जेव्हा कोणीही विचार केला नसेल. त्यानंतर चा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जर ती नरभक्षक वाघीण होती तर तीन महिने जंगलात इतक्या मोठ्या संख्येने वन विभागाचे लोक होते मग त्यांच्यावर हल्ले कसे नाही झाले? अवनीला बेशुद्ध करून पकडा असा आदेश सुप्रीम कोर्टाचा असताना त्याचे उल्लंघन करण्याचे साहस कसे येते? जर तुम्ही तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी खाजगी नेमबाज शफात अली खान यांच्या मुलाला यात सहभागी करून त्याच्याकडून बेकायदेशीररीत्या वाघिणीची हत्या करवून घेतली.यासोबतच असेही म्हटले गेले की अवनीला गोळ्याझाडून मारल्यानंतर बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले गेले. म्हणजे काय तर विचारपुर्वक आणि पूर्वतायरीनिशी केलेला खून आहे. कारण महाराष्ट्र आणि हैद्राबाद बरेच अंतर आहे.खाजगी नेमबाज हैद्राबाद मधून इथे येतो आणि हत्येत सहभागी होतो म्हणजे यात नक्कीच काही तरी गूड आहे.
            पण ही गोष्ट इथे संपत नाही कारण अवनीचा खून करून वनमंत्री मोकळे झाले असे नाही. आता प्रश्न आहे अवनीच्या दोन पिल्लांचा. जे अजूनही जंगलात आहे. त्यांचे संगोपन कोण करणार? काळजी कोण घेणार? जेव्हा प्राण्यांचे रक्षण करणार वनविभाग अवनीची हत्या करू शकते तर त्या पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्याकडे देणे किती योग्य ठरेल.?

-बुद्धभूषण जाधव.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..