एकनिष्ठता ही मजबुरी नसावी..



पहाटेचे ३वाजले होते. तरी दोघे झोपले नव्हते. वातावरणातला गारवा दोघांच्या निर्वस्त्र शरीराला स्पर्श करून लाजत होता. स्वतःचे स्त्रीत्व झाकत ती त्याच्या उघड्या छातीवर डोके ठेऊन त्याची धडधड ऐकत छातीवरच्या केसांशी खेळत होती. तो ही तिच्या नागड्या पाठीवर बोटांनी उगीच काहीतरी रेखाटत होता.
Image result for love in bed खोलीतील प्रत्येक निर्जीव वस्तू त्यांच्याकडे चोरट्या नजरेने बघत होती. भावनिक सहवासानंतर शारीरिक सहवास आणि आता फक्त आणि फक्त स्पर्शाचा सहवास घडत होता.
खरं तर शारीरिक गरज ही प्रत्येक सजीवांची गरज असते. प्रत्येक वेळेला फक्त नवीन जीव जन्माला घालण्यासाठी संभोग केला जात नाही. काही वेळेला संभोग हा आनंदासाठी केला जातो.तर काही वेळेला भावनिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या जोडीदाराला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रणय घडून आणल्या जातो. या खोलीत आज प्रणय घडून आला होता.
Image result for cuddling in bed
तो,"एक सांग.! जर मी दुसऱ्याएखाद्या मुलीच्या सहवासात अशीच एखादी रात्र राहिलो तर.?"
तिने जणू त्याचे काही ऐकलच नाही अशा अविर्भावात त्याला म्हणाली,"कॉफी घेणार.!मला जाम भूक लागलीये." आणि उठून अंगावर त्याचा व्हाईट शर्ट चढवत. जायला लागली तेच त्याने हाथ धरत तिला परत विचारले तू बोलली नाहीस.
ती(फक्त त्याच्याकडे वळून बघत बोलली) "तर काय होईल मग?"
तिचे असं बोलणे ऐकून तो आवाक झाला. त्याला वाटलं होतं कदाचित ती चिडेल. नाही काही तर खोलीभर त्याला मारायला त्याच्या मागे धावेल.पण तसं काहीस झालं नाही. तो तसाच उठून तिच्या मागे गेला. काही वेळ फक्त तिचे निरीक्षण करत होता. त्याच्या त्या पांढऱ्या शर्टमधून तिचे स्त्रीत्व डोकावू लागले होते. स्वतःला भानावर आणत तो काय बोलू? कसं बोलू? हे ठरवत होता.
एव्हाना त्याच्या मनात होणारी घालमेल आता चेहऱ्यावर दिसू लागली होती.
ती(हसुन) "काय झालं?"
तो," तू आता जे बोलली ते मला परेशान करत आहे. एखाद्या मुलीसोबत मी जास्त बोललो तरी चिडणारी तू. आज इतकं कूल रिऍक्ट कसं केलंस."
ती(त्याच्या जवळ येत) "इतकं जवळ तर कोणी ही येईल.पण माझ्यासारखं (त्याच्या हृदयावर हाथ ठेवत)इथं कोणी येऊ शकेल.
त्याने फक्त भुवया उंचावत तिच्या कमरेला धरून जवळ ओढलं.आणि हळूच बोलला,"हे शर्ट तुला खूप छान दिसत आहे. आणि वरचे दोन बटन उगडे आहे आता तर काय मला पूर्ण पागल करणार आहेस तू.!"
Image result for kiss in kitchen black and white
ती(त्याच्या आणखी जवळ येत. आता एकमेकांची धडधड ऐकू येईल इतके जवळ आणि दोघांमधून हवा पास होईल इतकही अंतर तिने ठेवणे गरजेचे नाही समजले. आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवत)" तू माझ्यासोबत एकनिष्ठ राहावे ही माझी इच्छा आहे पण बळजबरी नाही. कारण एकनिष्ठतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. मला काय वाटेल तुझ्या व्यभिचाराबद्दल या पेक्षा तुला ते किती योग्य वाटते हे महत्त्वाचे. So.. Mr. Engineer.! Its Yours Choice.!"
तो,"हो पण.." (तो काही बोलणार त्याच्या आधीच तिने त्याच्या ओठांवर परत ओठ ठेकवले. आणि एखाद्या युगाच्या तपश्चर्येतून तो तिला मिळाला या भावनेने, प्रेमाने ती परत त्याच्यात सामावू लागली.

- बुद्धभूषण जाधव 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?