समाजाच्या चौकटीचे प्रतिबिंब

Related image
           प्राथमिक शाळेत असताना परीक्षेला एक प्रश्न यायचा लिंग बदला. मुलगा - मुलगी, बैल - गाय, नवरा - बायको, म्हातारा - म्हातारी इ. या प्रश्नाचे पाच मार्क पक्के असायचे. कारण लिंग ही संकल्पना आपल्याकडे मुलं लहान आहे.तेव्हाच ठासून भरली जाते. 'रडू नकोस! तू काय मुलगी आहेस रडायला?' हा मुलांवर होणार सांस्कृतिक संस्कार. तर मुलींना भाऊ मोठा असला तरी,'तुझा दादा आहे ना! मग त्याला दे ती वस्तू.!' हा मुलींवर होणार सामाजिक संस्कार. मुलं जसं जशी मोठी होऊ लागतात.तसं त्याच्या व्यक्तिमत्त्वात, वागण्यात, बोलण्यात समाज डोकावू लागतो. जर तू मुलगा आहेस तर तुला रडून चालत नाही. तू आक्रमकचं असला पाहिजे. आणि जर तू मुलगी आहेस तर तू सहनशील हवी. तू नम्र हवी. तू आज्ञाधारक हवी. हा झाला समाजाने प्रत्येक मुलामुलीला घातलेला चष्मा.
           मुलं थोडे मोठे झाले की एक नवीन संकल्पना शिकतात. 'स्त्री-पुरुष समानता' पण ही संकल्पना कळेपर्यंत समाजाने आपल्याला असे काही घडवलेलं असतं की आपण समाजाच्या भाषेत बोलू लागतो. म्हणजे कसं बघा.! आपण आधुनिक काळात वावरतो हे दाखवण्यासाठी जर यांना विचारले की तुमच्या घरी मुलगा-मुलगी भेद केला जातो का? तर १०० पैकी ९९ जण नाही असं उत्तर देतील. हे थोडं स्पष्ट करा म्हटल तर मुलींकडून येणार उत्तर,"जर माझ्या भावाला चांगले कपडे घेतले तर मला ही चांगलेच घेतात." आणि मुलगा असेल तर छाती फुगवून सांगतो,"माझ्या बहिणीच्या शिक्षणाला आईबाबा पूर्ण पाठिंबा देतात." पण स्त्री पुरुष समानता मिळणाऱ्या जीवनशैलीपेक्षा जी जीवनशैली आपण एक स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून जगू शकत नाही याच्यावर चिंतन करण्यात असते. का एखादी स्त्री आपले मत आक्रमकपणे मांडू शकत नाही? का एखादा पुरुष आई,बहीण,बायको, मैत्रीण यांच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही.
Image result for gender
           आज जेव्हा आपण म्हणतो की जग एक खेड झालं आहे. त्यामुळे एक नवीन संकल्पना उदयास आली. 'लिंगभाव.' आपल्या जन्मामुळे आपल्याला लिंग मिळतो. तर समाजाच्या जडणघडणीतून जे लिंगनिहाय संस्कार केले जातात त्याला लिंगभाव म्हणतात. लिंगभाव ही संकल्पना स्त्री-पुरुषांना एक साचेबद्ध चौकटीत बांधुन एकमेकांच्या विरोधात उभे करते. म्हणजे हेच बघा ना!,'बाईचं मन कळायला बाईचा जन्म घ्यावा लागतो.' आणि 'कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय.' असे संवाद सहज ऐकायला मिळतात. म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे की एकमेकांच्या चौकटीत प्रवेश करायचाचं नाही.
           भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना आपण खूप सहजपणे बोलतो.भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. चित्रपटाला आपण समाजाचा आरसा म्हणतो. त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यात काही गाणे आपल्याला खूप आवडतात पण थोडा विचार केल्यावर लक्षात येते की ते गाणे सुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीचंच दर्शन घडवतात.

Image result for cinema and society
'बुरा है, भला है, जैसा भी है, मेरा पती मेरा देवता हैं।'
म्हणजे नवरा(पुरुष) कसा ही असला तरी चालेल. तू चांगलं वाग किंवा वाईट वाग मी तुझी पूजा करणार. तुला देव मानणार.
'तू हाँ कर या ना कर तू हैं मेरी किरण।'
तूझी इच्छा असो वा नसो तू माझीच आहे.कारण तू एक स्त्री आहेस आणि मी एक पुरुष त्यामुळे तुला समजून घेण्याचा मी कधीच प्रयत्न करणार नाही. असो.
            असं म्हणतात की स्त्री ही समाजव्यवस्थेचं प्रवेशद्वार असते. त्यामुळे जी स्त्री समाजाविरुद्ध बंड पुकारण्याचे धाडस ठेवते ती तिच्या मुलांना लिंगनिहाय भावनिक बंधनात न बांधता मुलीला उडायला मोकळे अवकाश. तर मुलाच्या भावनेला वाट करून देते.
-बुद्धभूषण जाधव 

(संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विभागात पार पडलेल्या लिंगभाव प्रबोधन कार्यशाळेत प्रा.अश्विनी मोरे आणि प्रा.मंजूश्री लांडगे यांच्या मार्गदर्शनामुळे लिंगभाव ही संकल्पना कळायला मदत झाली त्याबद्दल त्यांचे आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रा.डॉ संध्या मोहिते आणि प्रा.अनिता देवळे यांचे आभार) 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..