मी नग्न पाहिलं तिला..

Image result for naked back in bedroom
तिला कधी नग्न पाहिलं का?
काय म्हणालात?शरीराने?
नाही.! नग्न शरीर पाहून फक्त वासना शमते. पण तिच्या विचारांची नग्नता पाहून माणूस तृप्त होतो.!
कसं????
हम्मम...!
तर.. विचारांची नग्नता.!
तुम्ही कधी पाहिला एखादा माणूस(म्हणजे यात पुरुष आणि स्त्री दोघेही आले) नग्न अवस्थेत. पण तिला एकदा नक्की पाहिलं पाहिजे नग्न.! अगदी शरीराने, मनाने आणि विचाराने देखील.! तिला शरीराने नग्न पाहिलं की पुरुष तिच्यात रिता होतो. आणि विचाराने नग्न पाहिलं की तिच्यात सामावू लागतो. तिच्या विचारांचं नग्न असणं समाजाला कधीच मान्य नाही.
           तिला तिच्या स्त्री असण्याचा कधी कमीपणा वाटू नये. ती चारचौघात मासिक पाळी,सेक्स, आकर्षण या विषयावर बोलायला ती लाजत नाही. रात्रीच्या त्या प्रामाणिक सहवासानंतर तिच्या स्त्रीत्वाला ती कधी चारभिंतीच्या आत त्याच्यापासून लपवत नाही. ही गोष्ट ती मान्य करते की शरीर सुख ही तिची गरज आहे अगदी त्यांच्यासारखी. 
Image result for my choice deepika
           बऱ्याच वेळेला आपण माणसं नग्न या शब्दात गफलत करतो. माणसाच्या अंगावर कपडे नसणं म्हणजे नागडपण. आणि माणसाचे विचार समाजाच्या आरशाचं प्रतिबिंब नसणं म्हणजे नग्नपण. उदाहरण द्यायचे झाले तर दीपिका पादुकोन जी करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते पण जेव्हा ती 'My Choice' सारखा विडिओ बनवून समाजाचे नागडे विचार मांडू लागते तेव्हा तिला विरोध होतो. जेव्हा #metoo मोहीम तनुश्री सुरू करते तेव्हा तिच्या चारित्र्याचे दाखले देणारे अनेक नागडे लोक उभे राहतात. जसं ती विचाराने नग्न होऊन व्यक्त होते तसेच काही महिला विचारांनी नागड्यासुद्धा असतात. जर एखाद्या स्त्रीच्या छातीकडे एखादा माणूस डोळे वटारून बघत असेल तर बाजूची स्त्री त्या माणसाला काही बोलणार नाही पण बाजूच्या स्त्रीला नक्की सांगेल ओढणी/पदर सावरायला.
           माणसाचा जन्म नागडा होतं असतो. तो जन्म विचारांनी नागड राहून व्यतीत करायचा की नग्न होऊन समाजाच्या विरुद्ध उभं राहून हे आपलं आपणच ठरवायचं असतं.
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..