जेव्हा मी विनाकारण चिडतो..


Image result for all color rose flower 
         आजच्या दिवसाची सुरुवात खूप वाईट होती. असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. सकाळी उठायला उशीर झाला.उठायला उशीर म्हणून आवरायला उशीर आवरायला उशीर म्हणून Lecture ला उशीर. त्यामुळे वर्गात गेल्यावर ही जे चालू होतं ते कळेना. कारण तिने सकाळपासून एक मेसेज ही केला नाही. आणि मी कॉल केला तर उचलत नव्हती. त्यामुळे चिडचिड व्हायला लागली. त्यात भर म्हणून की काय नंतर पुन्हा 2 Lecture Off मिळाले. तेव्हा ही मी आजूबाजूचं जग विसरून फक्त तिला कॉल करण्यात लागलेलो शेवटी न राहवून तिला व्हाट्सअप्प ला मेसेज केला. 'मी Free आहे येतेस का?' काही सेकंदात मेसेज सिन झाला पण रिप्लाय काही केल्या येईना. तसाच रागारागात येऊन कॅन्टीनला बसलो. तर काही वेळातचं ती माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.मी तिला ओळखत नसलेल्या आविर्भावात तिथून उठून बाजूच्या टेबलवर जाऊन बसलो. तर तिथेे येऊन बसली. बराच वेळ शांत बसल्यावर जेव्हा ती शांतता बोलायला लागली. तिने हळूच एक पिवळा गुलाब माझ्या समोर धरला आणि बोलली,"आयुष्यभर माझ्या सोबत राहशील." मी ते फुल घेतलं पण गप्प होतो. असं नव्हतं की मला तिच्याशी बोलायचं नव्हतं. फक्त मला चिडायच नव्हतं. म्हणून मी शांत होतो. तिनेही काही न बोलता पांढर गुलाब समोर धरतं,"आपल्यातली मैत्री अबाधीत ठेवल्याबद्दल." हे गुलाब पण तोंड वाकड करत घेतलं. तरी तिचे स्मित कायम होते.कदाचित तिला माहीत होतं मी का चिडलो आहे? त्यानंतर तिने हिरवा गुलाब समोर धरला,"हे आपल्या नात्याच्या दिवसागणिक होणाऱ्या सकारात्मक वाढीसाठी." आता माझा राग कमी होत होता. आणि आजूबाजुचे लोक कळत-नकळत आमच्याकडे पाहत होते. तेवढ्यात तिने काळा गुलाब समोर धरला.मी ते फुल घेत फक्त भुवया उंचावल्या आणि नजरेनेच तिला विचारलं काय आहे हे.? तेच ती हसत बोलली,"हे माझ्यातील मी आणि तुझ्यातील तू एकमेकांवर हावी न होऊ देता. एकमेकांचा आधार होण्यासाठी."आता मी नकळत हसलो होतो.
Image result for all color rose flower 
तिने आता लाल, जांभळा आणि नारंगी रंगाचे तीन गुलाब एकसाथ समोर धरले आणि मी काही बोलणार तेच ती बोलली,"हे लाल गुलाब तू माझ्यावर प्रेम करतोस त्यासाठी. हे जांभळ्या रंगाचे गुलाब तू माझ्या मनावर अधिराज्य गाजवतोस हे सांगण्यासाठी आणि हे नारंगी फूल फक्त तुला हे सांगण्यासाठी की मला माहित आहे आपलं नातं इतर couple पेक्षा वेगळे आहे पण तरीही हे फुलं माझ्या आयुष्यात राहण्यासाठी." मी उठलो आणि हसत तिच्या गळ्यात पडलो. जणू मला आजूबाजूच्या लोकांचा विसर पडला होता. पण माझा रोज डे रोजसारखा न ठेवता special केल्यामुळे मी जगाला विसरणं गरजेचं होतं. नाही का?
-बुद्धभूषण जाधव.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..