कधीतरी मीही व्यक्त व्हावं...
मला आजचा दिवस आवडला. भावना व्यक्त करण्याचा दिवस. कुठेतरी वाटत होतं आज आपण ही व्यक्त व्हावं.म्हणजे कसं! मनात साचलेलं प्रेम, मैत्री, रुसवे-फुगवे सगळं बोलून मोकळं व्हावं. आणि पुन्हा नव्याने काहीतरी साठवाव मनात. तसं तर आपण रोजच बोलतो. पण थोडं वेगळं बोलणार आहे मी. कदाचित तु म्हणशील आज याला काय झालं. पण आज मी बोलणार आहे. कारण हे बोलण्यासाठी मी खूप वाट पाहिली आहे.असं नाही की मला तुझ्याशी बोलण्यासाठी खूप विचार करावा लागतो किंवा हिंमत एकवटावी लागते. फक्त आज इतरांचं व्यक्त होणं बघून मलाही व्यक्त व्हावंसं वाटलं.
खरं तर व्यक्त होणं म्हणजे काय हे मला कधीच कळत नाही. आता लिहीत आहे तरीही त्याशब्दचा शब्दशः अर्थ मी लावु शकतो पण मार्मिक अर्थ कळतं नाहीये. गेला आठवडाभर मी मानसिक प्रेम आणि शारीरिक प्रेम यावर वाचलं, ऐकलं, विचार केला. पण तुला माहीत आहे. मला प्रेम म्हणजे काय?हेच अजून उमजलेलं नाही. कारण प्रेमाच्या व्याख्येला ज्या उपमा असतात त्या माझ्या वास्तववादी आयुष्याला कधी लागू झाल्याचं नाही. मी प्रेमाला नेहमी विश्वास,स्वातंत्र्य आणि आदर या तीन गोष्टीत बघतो. कारण नात टिकायला म्हण किंवा टिकवायला म्हण या तीन शब्दांचा ताळमेळ घालता आला की आयुष्य सोपं होतं. बऱ्याच वेळेला नात तुटायला ही याच गोष्टी जबाबदार असतात.

कधी कधी एकमेकांच्या स्पर्शाची गरज पूर्ण करणं वेगळं आणि दुसऱ्यासाठी स्वतःचे अस्तित्व झुगारून त्याची गरज पूर्ण करणं वेगळं. खूप काही असतं नात्यामध्ये फक्त एकमेकांच्या आयुष्यातील जागा व्यापून सगळं होत नसतं. त्यामुळे सगळे व्यक्त होतात म्हणून मी व्यक्त होऊ का? मी एखाद्याच्या आयुष्यातील जागा व्यापून घेणार की ती जागा भरणार हे आधी स्वतःला विचारलं पाहिजे. तेव्हा कुठे आपलं व्यक्त होण्याला व्यक्त झालो म्हणता येईल. कारण व्यक्त होणं हे नेहमी इतरांसाठी नसतं कधी कधी ते स्वतःसाठी ही असतं.
-बुद्धभूषण जाधव.
खरंय...कवी
उत्तर द्याहटवा🙏
हटवामस्त छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏
हटवाछान
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏
हटवाChan
उत्तर द्याहटवाDhanyawaad
उत्तर द्याहटवाKhup chan bhushan👌👌
उत्तर द्याहटवाThankyou ऋता.!
हटवा