पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्त्री स्त्रीचं असते, पुरुष पुरुषचं असतो...

इमेज
           'आम्ही आमच्या मुलीला मुलाप्रमाणे ठेवतो.!' असं वाक्य ऐकलं आणि आम्ही सगळयांनी मागे वळून बघितले. तर एक बाई आपल्या मुलीचा परिचय असा करून देत होती. मुद्दा हा नव्हता की परिचय कोण आणि कसा देत होत. आम्हाला बघायचं फक्त इतकंच होतं की मुलीला मुलाप्रमाणे घडवतात म्हणजे नेमकं काय करतात? आणि त्या मुलीला बघून वाटलं खरचं त्यामुलीला मुलाप्रमाणे ठेवतात. ती मुलगी साधारण १६-१७ वर्षाची असावी. तिने T-shirt आणि Jeans (Top नाही मुलांचे T-shirt) परिधान केलेलं.डोक्यावर फक्त दीड-दोन इंच लांबीचे केस. आम्ही सगळे एकमेकांकडे पाहू लागलो. कारण आजपर्यंत पुस्तकात आणि वृत्तपत्रात वाचले होते उच्चभ्रू समाजातील लोक त्यांच्या मुलींना मुलांप्रमाणे वाढवतात. पण आज मध्यमवर्गीय लोक सुद्धा मुलींना मुलाप्रमाणे घडवतात हे प्रत्यक्ष पाहिले.आणि त्यात वाईट असं काहीच नाही. पण अस म्हणतात की सोळाव्या वर्षानंतर स्त्री खऱ्याअर्थाने सुंदर दिसते. त्यालाच तर वयात येणं म्हणतात. यावयात ती 'स्त्री' म्हणून घडत असते. म्हणून तर आपल्याकडे गाण्यात सुद्धा स्त्रीच्या सुडौल शरीराचे वर्णन करत...

ग्रे आयुष्य..

इमेज
रात्रीचे १२ वाजले होते. मी अजूनही गॅलरीत फेऱ्या मारत होतो. का? काय विचारता 'ती' अजून आली नव्हती ना.! 'ती' म्हणजे माझी प्रियसी. हो आम्ही लग्न नाही केलं अजून. पण आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. आता ही संकल्पना तशी नवीन असली तरी मोठ्या शहरांमध्ये बाऊ करण्याइतपत वेगळी राहिली नाही. ती वैद्यकीय पेशात असल्यामुळे तिचे येण्याचे टाईमिंग फिक्स नसतात. पण आज मी खूप आतुरतेने तिची वाट पाहत होतो. कारण, ती आज पूर्ण १३ दिवसानंतर ती एका मेडिकल सेमिनार वरून परत येत होती आणि जोडून जागतिक महिला दिन आलेला. तिला जगजीत सिंग च्या गझल प्रचंड आवडतात म्हणून मंद आवाजात हॉल मध्ये गझल लावल्या. अरेच्चा.! आली वाटत ती. ती(दरवाजा उघडत), "झोपला नाही अजून?" मी,"आतापर्यंत कधी झोपलो का?तू प्रवासात असल्यावर!" ती(मला घट्ट मिठी मारत)," किती मिस केली मी ही मिठी." मी मिठी आणखी थोडी घट्ट करत, "Happy Women's Day.!" ती,"Thankyou.! पण तुला एक सांगू?" मी सोफ्यावर बसतं,"सांग ना.!" ती माझ्या मिठीत येत,"तू जेव्हा महिला दिनाच्या शुभेच्...