स्त्री स्त्रीचं असते, पुरुष पुरुषचं असतो...
'आम्ही आमच्या मुलीला मुलाप्रमाणे ठेवतो.!'असं वाक्य ऐकलं आणि आम्ही सगळयांनी मागे वळून बघितले. तर एक बाई आपल्या मुलीचा परिचय असा करून देत होती. मुद्दा हा नव्हता की परिचय कोण आणि कसा देत होत. आम्हाला बघायचं फक्त इतकंच होतं की मुलीला मुलाप्रमाणे घडवतात म्हणजे नेमकं काय करतात? आणि त्या मुलीला बघून वाटलं खरचं त्यामुलीला मुलाप्रमाणे ठेवतात. ती मुलगी साधारण १६-१७ वर्षाची असावी. तिने T-shirt आणि Jeans (Top नाही मुलांचे T-shirt) परिधान केलेलं.डोक्यावर फक्त दीड-दोन इंच लांबीचे केस. आम्ही सगळे एकमेकांकडे पाहू लागलो. कारण आजपर्यंत पुस्तकात आणि वृत्तपत्रात वाचले होते उच्चभ्रू समाजातील लोक त्यांच्या मुलींना मुलांप्रमाणे वाढवतात. पण आज मध्यमवर्गीय लोक सुद्धा मुलींना मुलाप्रमाणे घडवतात हे प्रत्यक्ष पाहिले.आणि त्यात वाईट असं काहीच नाही. पण अस म्हणतात की सोळाव्या वर्षानंतर स्त्री खऱ्याअर्थाने सुंदर दिसते. त्यालाच तर वयात येणं म्हणतात. यावयात ती 'स्त्री' म्हणून घडत असते. म्हणून तर आपल्याकडे गाण्यात सुद्धा स्त्रीच्या सुडौल शरीराचे वर्णन करतांना सोळा हा आकडा वापरला जातो. 'सोलह बरस की बाली उमर को सलाम,प्यार तेरी पहली नज़र को सलाम' किंवा 'सोळावं वरीस धोक्याचं गं सोळावं वरीस धोक्याचं' यासारखे गाणे आहेत.
एक किस्सा सांगतो, माझी एक मैत्रीण. एका उच्चभ्रू वस्तीत राहणारी.आई वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे खूप लाड. एक दिवस कॉलेजमध्ये तिची आई आलेली तर बोलता बोलता आमच्या मॅडम बोलल्या की तुम्ही तुमच्या मुलीला मुलाप्रमाणे वाढवले. तर तिची आई खूप पटकन उत्तरली,"नाही.!आम्ही आमच्या मुलीला मुलाप्रमाणे नाही मुलीप्रमाणे वाढवले." खरं तर मॅडम आणि आम्ही सगळेच विचारांची पाटी रिकामी कोरी असल्याप्रमाणे ऐकत होतो. तिची आई चेहऱ्यावर स्मितहास्य आणत,"कसं असतं ना मॅडम.! ज्यांना मुलगा हवा असतो पण पदरी मुलगी पडते ते आपली निराशा समाजापासून लपवण्यासाठी असं बोलून मोकळे होतात. पण माझी मुलगी माझा अभिमान आहे. त्यामुळे तिला मुलगा म्हणून मी माझा अभिमान कमी का करून घ्यावा.?" माझ्या मैत्रिणीच्या आईने तेव्हा जे बोललं ते तेव्हा नक्कीच कळालं नव्हतं पण आज या मुलीला पाहून मी माझी ती मैत्रीण जेव्हा डोळ्यासमोर उभी करतो. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मुलगीच उभी राहते. टॉप-जीन्स घातलेली. लांबसडक केस, कानात तोऱ्यात डोलणारे कानातले. हे असतं स्त्रीचे बाईपण.
मुलींना मुलाप्रमाणे वाढवणे/घडवणे/ठेवणे. हे आपल्या कानावर नेहमी पडतं पण मुलांप्रमाणे ठेवण्याचा हट्टहास का? हा प्रश्न ना कधी बाईला पडला ना पुरुषाला.

-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा