ग्रे आयुष्य..

Image result for woman's day
रात्रीचे १२ वाजले होते. मी अजूनही गॅलरीत फेऱ्या मारत होतो. का? काय विचारता 'ती' अजून आली नव्हती ना.! 'ती' म्हणजे माझी प्रियसी. हो आम्ही लग्न नाही केलं अजून. पण आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. आता ही संकल्पना तशी नवीन असली तरी मोठ्या शहरांमध्ये बाऊ करण्याइतपत वेगळी राहिली नाही. ती वैद्यकीय पेशात असल्यामुळे तिचे येण्याचे टाईमिंग फिक्स नसतात. पण आज मी खूप आतुरतेने तिची वाट पाहत होतो. कारण, ती आज पूर्ण १३ दिवसानंतर ती एका मेडिकल सेमिनार वरून परत येत होती आणि जोडून जागतिक महिला दिन आलेला. तिला जगजीत सिंग च्या गझल प्रचंड आवडतात म्हणून मंद आवाजात हॉल मध्ये गझल लावल्या.
अरेच्चा.! आली वाटत ती.
ती(दरवाजा उघडत), "झोपला नाही अजून?"
मी,"आतापर्यंत कधी झोपलो का?तू प्रवासात असल्यावर!"
ती(मला घट्ट मिठी मारत)," किती मिस केली मी ही मिठी."
मी मिठी आणखी थोडी घट्ट करत,"Happy Women's Day.!"
ती,"Thankyou.! पण तुला एक सांगू?"
मी सोफ्यावर बसतं,"सांग ना.!"
ती माझ्या मिठीत येत,"तू जेव्हा महिला दिनाच्या शुभेच्छा देतो तेव्हा छान वाटतं. त्यापेक्षा एका योग्य व्यक्तीने शुभेच्छा दिल्या याच समाधान वाटत."
मी(तिच्या हातांच्या बोटांशी खेळत),"का?"
ती," तुझं प्रपोज.! तु मला प्रपोज करतांना बोलला होतास. मी तुझ्यावर प्रेम करतो. किती ते मला सांगता येणार नाही. आणि तुझा होकार असेल तर आत्ताच नको देऊ. मला तुझ्यातली 'ती' आजन्म जपायची आहे.तुला ते मान्य असेल तर हो म्हण.' आणि मी खरंच विरघळले होते."
मी,"बरं... अजून काही!"
ती,"माझं तुला विचारणं आपण लिव्ह इन मध्ये राहू. तर तू या फ्लॅटमध्ये २बेडरूम तयार केलेल्या जेव्हा मी विचारलं असं का? तर तू खूप सहजपणे म्हणाला होतास.'तुला तुझा space नको मिळायला.!' त्यानंतर मी जेव्हा जेव्हा रात्री उशिरा हॉस्पिटलमधून येते. तेव्हा न चिडता तू पुस्तक घेऊन गॅलरीत चकरा करतोस. माझी काळजी वाटते म्हणून पण कधी त्या काळजीचा माझ्या पायातली बेडी बनू दिली नाहीस."
Image result for life is never black and white
मी,"हे बघ.!Life is never black or white. It's always in the shades of Grey. पण होतं काय आपल्याला सिनेमा बघून आणि न्युज चॅनेल बघून आयुष्य काळ आणि पांढर असं बघायची सवय झाली त्यामुळे कुठेतरी स्त्रीवाद आणि पुरुषवाद हे परस्पर विरोधी उभे करून आपण मोकळे होते. पण कधी ते पांढर आणि काळ यांचं मिश्रण राखाडी असतं हे आपण बघतच नाही."
ती,"Thats Why.! I Love You.!"(आणि माझ्या मांडीवर डोके ठेवून तशीच झोपी गेली)
ती झोपी गेल्यावर मला जाणवलं की गझल अजूनही चालू आहेत.ती शांत झोपली होती आणि मी तिचे ते झोपलेलं रूप बघत होतो आणि गझल ऐकत होतो.
तेरे आने की जब ख़बर महके,
तेरे खुश्बू से सारा घर महके....
शाम महके तेरे तसव्वुर से,
शाम के बाद फिर सहर महके....
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..