माझं आयुष्यभराचं व्यसन..📚📚


Image result for book
किताबें..
पुस्तके..
माझं आयुष्यभराचं व्यसन. अगदी लहानपणीच आईच्या साक्षीने सुरू झालेले हे व्यसन. साधारण तीन साडेतीन वर्षाचा असेल तेव्हा आईसोबत शाळेत जायचो. आई ग्रंथपाल असल्यामुळे पुस्तकाच्या सानिध्यात दिवस जात होता. पण फक्त पुस्तक उघडून चित्र तरी किती दिवस पाहणार आणि एका ठराविक काळानंतर मला ते काम खूप रटाळ वाटू लागलं म्हणूनच की काय मी वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत जाण्याआधीच वाचायला शिकलो.(आजची मराठी शाळेची स्थिती पाहून हे खोटं वाटत बऱ्याच वेळेला) पण हो मी शाळेत जाण्याआधी पुस्तकात रमायला शिकलो.आणि इतकं रमलो की पुस्तकाबद्दल असलेलं माझं प्रेम दिवसागणिक वाढत गेलं पण कमी नाही झालं. असं म्हणतात की 'पुस्तक हा माणसाचा Best Friend असतो.' पण मला कधी हे पटलंच नाही. म्हणजे बघा.. माझ्यासारखा नास्तिक माणूस जो ईश्वराचे अस्तित्व नाकारतो. तो पुस्तकासमोर नतमस्तक होतो. पुस्तकाला चुकून पाय लागला किंवा हातातून पडलं तर लगेच पाया पडतो. यासाठी नाही की मला त्यात देव सापडला पण यासाठी की मला त्यात गुरू सापडला.
Image result for rose in book
पुस्तक हा कितीही  जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याच्या जोडीने डायरी, वही, पत्र आणि हो गुलाबाचं फुल सुद्धा येतंच की. म्हणजे पुस्तकात अचानक मिळणारी वाळलेली फुले, सुगंधी सुखद संकेतचिन्हे, आपण लिहिलेली पण न पाठवलेली पत्र. डायरीच्या शेवटच्या पानावर तिच्या/त्याच्या नावाला उगीच स्वतःच्या नावाशी जोडून कारण नसताना हसणं. गुलजार त्याच्या 'किताबें' या कवितेचं म्हणतात,
"किताबें माँगने,गिरने, उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा
वो शायद अब नहीं होंगे.!"
खरंतर आजची स्थिती बघता मी स्वतःला खूप नशीबवान समजतो कारण आमच्या लहानपणी जरी मोबाईल भारतात आला असला तरी घरी माञ एकचं मोबाईल असायचा. ज्यात फक्त फोन यायचा आणि जायचा पण आता काळ खूप झपाट्याने बदलला आहे. आजकाल आईवडिलचं मुलांना तू हे कर मग आपण मोबाईल खेळू म्हणून मोबाईल सोपावतात. का इतक्या आपुलकीने पुस्तक हातात देऊ नाही वाटत? असो..

Image result for reading book on stairs animation

एका मोठ्या शाळेत असल्यामुळे ग्रंथालयाची भव्य अशी स्वतंत्र्य इमारत होती. मी नेहमी तिथे जिन्यावर बसून पुस्तक वाचायचो. शाळेतील सर्वात सुंदर मुलगी जी प्रत्येकाची 'Dream Girl' होती. तिचं आणि माझं पहिलं बोलणं पण तिथेच झालेलं तिला निबंध स्पर्धेसाठी मदत हवी होती आणि मी त्या विषयाचे काही मुद्दे सांगितल्यामुळे तिला बरीच मदत झाली आणि तिने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचा आनंद म्हणून की काय तिने मला मिठी मारली. माझ्यासाठी ती मिठी वेगळी अशी नव्हती कारण पुस्तकाची मिठी मला जास्त घट्ट वाटायची. तेव्हा ही आणि आजही (माणसं बदलात काळानुसार पण पुस्तक जीर्ण झाले तरी बदलत नसतं)
हा त्या मिठीचे मला आणि तिला(असं मला वाटतं) काही वाटतं नसले तरी नंतरची दोन महिने सर्वांना चघळायला विषय झाला.
नंतर कॉलेज मध्ये गेलो तर तिथेही माझं पुस्तकाचं आणि जिन्याच नात कोणीच तोडू शकलं नाही. पण मी शेवटच्या वर्षाला असेल तेव्हा एका द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलीने माझे लिखाण वाचून आणि एका काव्यवाचन स्पर्धेत बक्षीस मिळाल्याबद्दल मला हात मिळवून अभिनंदन केलं. पण तो एक प्रसंग जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा मला गुलजारची 'उसने अचानक हाथ पकडकर..' ही कविता सतत आठवते. त्या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी आहेत.
"......
हाथ ही छूट गया वरना...
दिल का पहला दौरा ऐसा बुरा नहीं था.!!"
सगळी फक्त आठवणींची पुस्तके हो.!!
किताबें...    दुसरे काय?

-बुद्धभूषण जाधव


#World_Book_Day

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?