अपनी माँझी कि जुस्तुजू में बहार...

Image result for mobile message notification
आज तिचा मेसेज आला,'कसा आहेस? I Hope विसरला नसशील.!'
माझ्या फोन मध्ये तिचा नंबर आजही सेव्ह आहे.म्हणून विसरण्याचा प्रश्नच नव्हता. मी ही रिप्लाय दिला थोडा खोचकपणे,'नाही तुला कसं विसरेल? आयुष्यातला सर्वात मोठा काळ तुला Best Friend म्हणण्यात घालवला. आणि कसं असतं कधी कधी आपल्या भूतकाळाशी संवाद साधण्यात आनंद असतो नाही का?"
           आता ती ऑनलाइन दिसत होती पण रिप्लाय देत नव्हती. कदाचित विचार करत असेल काय बोलू? कसं बोलू? आणि जेव्हा हे दोन प्रश्न दोघांमध्ये येतात तेव्हा समजावं आपलं नात एकतर संपलय किंवा नात शेवटच्या घटका मोजत आहे. तसं पाहता आमचं नात तेव्हाच संपलं होतं आता उरल्या होत्या फक्त त्या नात्याच्या छटा ज्या आता संध्याकाळ झाली म्हणून अंधुक झाल्या होत्या आणि अंधार पडल्यावर दिसणार नाही असा मला विश्वास आहे.
Image result for best friend
           प्रत्यक्षात तो काळ संपल्यानंतरही त्याच्या स्मृती आपल्या मनात घर करून असतात.त्यांच्या अस्तित्वाचा खेळ सदैव चालूच राहतो आणि मग 'बीते रिश्ते तलाश करती हैं.!' ही केवळ गुलजारच्या गझलची एक ओळ न राहता परत परत भूतकाळात रमण्याची कारणमीमांसा बनते. त्यात दुःख साजरे करून घेण्याचा भाग नसतोच असे नव्हे.पण त्याहीपेक्षा निरपेक्ष तटस्थपणे त्याकडे बघण्याचा प्रकार त्यात जास्त असतो.त्यातूनच अशा गोष्टी म्हणजे 'बीते रिश्ते' वाटू लागतात.
Image result for touch
           समाधानाची बोळकुली आणि सुखाचा खाऊ मिळवायचा तर सहवासाची भातुकली मांडावीत लागते.या भातुकलीचे काही खेल रंगतात;काही भंगतात.काही काही नुसतेच सुरू राहतात.काही तर मनात खूप इच्छा असूनही सुरूच होत नाहीत.आयुष्याच्या अशा भातुकलीचा कोणताही प्रकार आपल्या वाट्याला आला तरी आठवणींची शिते आपल्याला जरूर मिळतात. त्यांच्याशी असणाऱ्या आपल्या भावनिक सहचर्याने त्यांना उष्टी-खरकटी म्हणवत नाही इतकेच! जोडीने खाल्लेल्याला आपण उष्टे म्हणत नाही आणि सहवासाच्या अधिरेपणातील सांड-लवंडीला आपण खरकटे म्हणत नाही.हे सारे सापेक्ष शब्द विरहात सुचणारे आणि त्याहीपेक्षा विच्छेदनात टोचणारे आहेत.
           अशा भातुकलीच्या आठवांचे ओले सण हा विषय साहित्याला नेहमीच भुरळ पाडत आला आहे. 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे..' असे कितीही सांगितले तरी 'दोन घडीचा डाव..' असा हा खेळ मांडला जातो.अगदी 'मनासारखा मिळे सवंगडी..' अशी स्थिती असली तरी कधी ना कधी तरी अपेक्षाभंगाची ठेच लागतेच.असा सवंगडी नाही मिळाला तर काही विचारायलाच नको.
Image result for broken heart
अपेक्षाभंगाची अशी ठेच हा त्या खेळाचा अंगभूत आणि अपरिहार्य असा भाग आहे.त्यामुळे तो अनुभव अनेकदा पण प्रत्येक वेळी नव्याने येत असतो. असा दुखरा कोपरा आपला कातर स्वर लपवून ठेवू शकत नाही. सहृदयतेच्या सीमेवर तर त्याचा सूर जरा जास्तच तीव्र होतो.अशा तीव्रतेच्या प्रत्येक क्षणी,
"दिल अगर है तो दर्द भी होगा
इसका कोई हल नहीं है शायद"
ही गुलजारची ओळ फार फार जवळची वाटू लागते.

-बुद्धभूषण जाधव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..