विरहात खरोखरच जग वसते..




Image result for hand shake bf gf breakup

'आता भेटू शकतो का?'
'बोल ना.!'
'बरं ठीक आहे! आपण बाहेर भेटू.!'
'नाही तर जाऊदे.!'
'बरं.. ऐक ना.!! आपण शेवटच भेटू एकदा.'
तिच्या मघापासून येणाऱ्या मेसेजला वाचत होतो. पण मी उत्तर देत नव्हतो. कारण तिच्या भावनांचा होणारा गोंधळ मी समजू शकत होतो. पण शेवटच भेटू हे शब्द मला अस्वस्थ करून गेले. लगेच फोन हातात घेतला आणि तिला कॉल केला. पहील्या रिंगमध्ये तिकडून आवाज आला.
"हॅलो.! बोल ना."
मी,"काय झालं?"
ती,"आपण वेगळं होण्याचा निर्णय जितका समजूतदार पणे घेतला.तितकं सोपं नाहीये माझ्यासाठी तुला दूर करणं."
मी(हसून),"हे तर माझ्यासाठी सुद्धा सोपं नाहीये.! आपण फोन चा वापर खूप कमी करायचो कारण माहीत होतं. आपण बोलत जरी नसलो तरी एकमेकांसाठी आहे.पण.."
(मला मधेच तोडत पुढे ती बोलू लागली)
ती,"पण आता जास्त गरज वाटत आहे एकमेकांच्या आधाराची."
मी,"तू काय म्हणत होती मघाशी.?"
ती,"आपण भेटूया का? शेवटचं!"
मी,"हम्म.. ठीक आहे कुठे भेटायचं?"
ती(आनंदाच्या स्वरात),"बाहेर भेटू.! नाही नको! तुझ्याघरी.?"
मी,"चालेल.!"
ती,"मला शेवटच एकदा बघायचं आहे ते घर जे मी माझं मानलं होतं."
मी फक्त ऐकत होतो. आणि ती व्यक्त होत होती.
ती,"चल येते मी संध्याकाळी."
मी(हातातल्या पेंसिल ने कागदावर गोल गोल करत),"हम्म मी वाट बघेल."
आणि फोन कट करतो.
साधारण रात्री 9 वाजेला ती माझ्याघराच्या दारात उभी होती.ती येणार म्हणून मी दार उघडच ठेवलं होतं.
ती(गडबडीने आत येत),"सॉरी थोडा उशीर झाला. एक
Emergency होती.
मी(थोडस हसत),"तू कधीच नाही बदलू शकत.!"
ती(थोड्या निराश स्वरात),"पण आता बदलावे लागेल.!"
आम्ही दोघं दोन फूट अंतर राखून उभं होतं. पण आज अस वाटत होतं जणू आम्ही मैलाच्या अंतरावर उभं आहे.
ती,"तुला एक मिठी मारली तर चालेल का?"
तिने प्रश्न केला खरा पण उत्तर येण्याआधीच माझ्या मिठीत ती विसावली होती.मीही सुखावलो होतो. मिठी घट्ट करत केव्हा आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं कळालंच नाही.जेव्हा तिच्या डोळ्यातल्या पाण्याने माझं शर्ट ओल झालं आणि आणि माझ्या डोळ्यातील पाण्याचा थेंब तिच्या मानेवरून होत खांद्यावर आला.तेव्हा आम्ही शुद्धीवर येत एकमेकांचे अश्रू पुसले. मी तिला हाताला धरत सोफ्यापर्यंत आणले.
ती,"मला माहित होतं सोफा कुठे आहे.?"
मी,"मला उद्या माहीत आहे म्हणून तुला आणि तुझ्या स्पर्शाला मी आज जगून घेत आहे."
ती(माझे केस विस्कटत),"तू पण कधीच बदलणार नाही Writer_Saab."
आणि दोघेही हसायला लागलो.हसता हसता दोघांमधले अंतर नकळत संपले. 

Image result for kissing



तिच्या श्वासाचा गंध मला माझ्या श्वासात जाणवू लागला. मघापासून दूर होण्याची काळजी आता मिटली होती. फक्त ती आणि मी इतकेच काय उरले होते.बऱ्याच वेळ एकमेकांच्या ओठांना ओठ भिडवल्यावर, एकमेकांच्या जिभेने खेळल्यावर मी तिला थोडं बाजूला केलं. आणि विचारलं,"तुझी बाटणार तर नाही ना.?" तेच माझ्या कानाखाली एक लावत ती उभारली,"तुझ्या स्पर्शाने जर मी बाटली जात असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण हे श्वास तुझे आहेत. आणि माझ्या श्वासाला जात नाहीये.!" मी काही React करावं त्याआधीच तीने परत माझ्या ओठांवर हक्क गाजवायला सुरुवात केली.तिच्या कानातले झुमके मला अडथळा वाटत होते.मी ते काढून बाजूला फेकले. हॉल ते बेडरूम हा प्रवास केव्हा झाला हे कळालच नाही. निवस्त्रं होताना नकळत हात लाईट बंद करायला वळला. तेच मला थांबवत,"नको करू off मला आज सगळ्या गोष्टी मनासारख्या करू दे. पुन्हा हे क्षण येणार नाही. एकमेकांच्या डोळ्यात बघत शरीराने एक झालो.मला जाग आली तेव्हा अडीच वाजले होते.मी नेहमीप्रमाणे शांत झोपली होती.फक्त आज तिच्या चेहऱ्यावर एक भीती दिसत होती सर्व काही गमावण्याची. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट बाजूला करत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आणि मी उठणार तेच तिने माझा हात धरला आणि 

Image result for couple sleeping


माझ्या छातीवर डोकं ठेवत,"मला प्रॉमिस कर आपण सोबत असलो किंवा नसलो तरी या तुझ्या आयुष्यातील पहिलं स्थान माझं राहील."
मी,"काय? कस शक्य आहे ते.?"
ती,"माहीत नाही.! पण जेव्हा जेव्हा मी तुझ्या छातीवर कान लावते तेव्हा असं वाटत जणू काही तुझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका माझा आहे."
मी,"हे बघ मी तुला कायम माझ्या आयुष्यातील पहिलं स्थान देऊ शकेल का?माहीत नाही.! पण हो! जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम हे प्रकरण समोर येईल तेव्हा फक्त आणि फक्त तुझाच अधिकार राहील."
ती काही बोलेल असं वाटतं होतं.पण ती झोपी गेली होती.(मी स्वतःशीच हसत) "ऐकलंच नाही."
आता खोलीतली शांतता आणि तिच्या श्वासांची गरमी मला अस्वस्थ करत होती. मनात साठवून ठेवलेले प्रश्न आता जास्त तीव्रतेने उत्तर मागत होते.विरहात खरोखरचं जग असते.
खरचं किती सहजतेणे आपण स्वतःला पुरोगामी म्हणून मोकळे होतो ना.! जेव्हा प्रश्न स्वतःच्या आयुष्याचा असतो.तेव्हा कळत नकळत आपण प्रत्येक गोष्टीला घटनेला आपण समाजाच्या तकलादू चौकटीच्या त्या मापात जोडायला पाहतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल.जर इतकंच प्रेम आहे तर वेगळं का होतात? आणि जर वेगळे होताय तर हे शारीरिक संबंधाचा खटाटोप कशासाठी?
खरंतर हे उत्तर मी सुद्धा शोधत आहे.
सकाळी ७ वाजेला नेहमीप्रमाणे अलार्म वाजला म्हणून उठलो आणि बाजूला पाहिलं तर ती नव्हती. उठून घरभर तिला शोधलं पण ती नव्हती.पळत पळत येऊन हातात मोबाईल घेतला तिला कॉल केला पण फोन स्वीच ऑफ होता. म्हणून Whatsapp उघडलं तर तिचाच मेसेज होता.
'GOOD MORNING WRITER_SAAB Thankyou रात्री मला माझं सर्वस्व परत केल्याबद्दल.
आणि हो..मला आवडेल आयुष्यभर तुझ्या लव्ह स्टोरी ची पहिली हिरोईन व्हायला. Btw मी झोपली नव्हती रात्री.फक्त उत्तर नव्हतं म्हणून शांत होते किंवा मला ते सगळं साठवायच होत मनात म्हणून फक्त ऐकत होते. Sorry सकाळी न सांगता निघून आले. कारण तुझ्या चेहऱ्यावरच ते झोपेतल निरागस बाळ मला हरवू द्यायच नव्हतं.
आणि हो.!तुझ्या शर्टवर माझा स्पर्श आणि लिपस्टिक सोडून जात आहे.आज शेवटच Good Morning Song माझ्या आवाजातलं.'
मेसेज वाचून डोळे पाणावले होते. रात्र तिला मिठीत घेऊन सरली होती.पण आता...
पाणावलेल्या डोळ्याने सर्व काही धूसर दिसत होतं.दिसत होती फक्त ती..आणि शिळ्या अपेक्षांची रात्र. डोळ्यांच्या किनाऱ्याचा बांध फुटला आणि अश्रूने ओघळत गाल भिजवला. थोडस भानावर येतं. माझं शर्ट कुठंय ते शोधू लागलो. पलंगावरच ठेवलं होतं तिने ती नेहमी झोपायची त्या बाजूला. मी शर्ट हातात घेतला नि तिच्या ओठांनी उमटलेल्या लिपस्टिकच्या लाल रंगावर माझे ओठ टेकवले. 




Image result for lipstick mark on shirt


आणि व्हाट्सअप्प वर आलेलं Song प्ले केलं.
बुझी मगर बुझी नहीं
न जाने कैसी प्यास है
करार दिल से आज भी
ना दूर है ना पास है
ये खेल धूप-छाँव का
ये कुर्बतें, ये दूरियां
सुना रहा है ये समा,
सुनी-सुनी सी दास्तां
फज़ा भी है जवां-जवां.
या शब्दांवरही मला अडखळायला झालं. कारण अडखळणही कसे असते? पडलो याचे भान असते;पण का आणि कशामुळे पडलो हेही शोधायचं असतं.त्यात आपसूकच मागे बघितलं जातं.हे मागं बघणं शीळ आहे हे पटत असतं.पण ते होतंच.आठवण आणि अडखळण जितकं शीळ तितकं ते अनुभवणारे तन-मनही शिळेच!पण शिळे झाले तरी टाकवते थोडेच!!
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

  1. Wow nice bhushan mene pura padha kya likha he so nice yese hi likho or muje link send karo

    उत्तर द्याहटवा
  2. डोळे पाणावले दादा खरंच खुप सुंदर मांडलं आहे आणि खर सांगू तर शेवट नक्की काय होईल याची उत्सुकता होती, पण शेवटी निःशब्द व्हाव लागलं

    उत्तर द्याहटवा
  3. Khop💯💯💯💯💯 ch chan ahe...mast
    💜💕💗💖💝💓💜

    उत्तर द्याहटवा
  4. लिखाणात जिवंतपणा जाणवतो..
    सुरवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता कायम होती..
    अप्रतिम

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?