प्रेम खूप हतबल असतं..

         Image result for prem
  पहिलं प्रेम, पहिली भेटं, पहिला स्पर्श, पहिल्यांदा चहा एका कपातून घेणं, मुसळधार पावसात एखाद्या मुलीसोबत एकाच छत्रीतून जाणं.(विनाकारण डोक्यात प्यार हुआ इकरार हुआ.. गाणं चालू असतं) हे सगळं विसरणं तस अवघड असतं. कारण ते सगळं पहिलं असतं. त्या पहिल्या शब्दासोबत येणारी अनामिक भीती. जाणते अजाणतेपणे असलेली ओढ.
           माणूस प्रेमात असला की स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करतो. असे विश्व जिथे जात, धर्म, वर्ण या गोष्टींना मानणारा समाज नसतो. आणि असला तरी त्यांना जुमानेलं ते प्रेम कसलं? पण बऱ्याचदा पहिलं प्रेम हे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहचत नसतं. त्या प्रेमाचा प्रवास नको त्या वळणावर थांबत असतो. आणि ते वळण म्हणजे जिथून U टर्न घ्यायचा मार्गच नसतो. कारण त्या पहिल्या प्रेमात माणूस पुरता वेडा झालेला असतो. वाहवत तर इतका जातो की त्याला नंतर स्वतःला शोधणे अवघड होऊन बसतं.
Image result for breakup
           त्यांनतर अचानक वेगळं झालं की आयुष्यात एक खालीपण येतं.असं खालीपण जिथे ती जागा कोणीतरी भेटलं की भरणार असते.पण दूर गेलेल्या त्या व्यक्तीचं अस्तित्व त्यात कायम डोकावत असतं. त्यामुळे ती रिकामी जागा भरणे अवघड होऊन बसतं.आणि नकळत अपेक्षांचं ओझं दुप्पट होतं. डोक्यावर ते ओझं घेऊन वावरतांना माणूस पुरता दबून जातो. खूप प्रयत्न करून, स्वतःशी झगडून माणूस त्या अपेक्षांची राखरांगोळी करतो आणि पुन्हा नवी सुरवात करू लागतो.आयुष्यात पुन्हा कोणी तरी डोकावत. तो जेव्हा आयुष्यात डोकावतो ना! तेव्हा पुन्हा एकदा तीच अनामिक भीती. तीच नकळत ओढ. पुन्हा त्या व्यक्तीला गमावण्याची भीती.
Image result for dependent love
           लोक म्हणतात पहिल्या प्रेमात हे सर्व असतं. कारण तिथे पहिलं हा शब्द जोडलेला असतो. पण जेव्हा माणूस कोलमडून पडतो आणि परत सावरून कोणाला तरी जीव लागतो. तेव्हाही माणूस तितकाच हतबल होतो. त्या स्पर्शासाठी, त्या सोबतीसाठी सर्वात महत्त्वाच म्हणजे त्या व्यक्तीसाठी.आणि ही हतबलता कुठून येते तर या प्रेमातून. प्रेम माणसाला हतबल करून सोडते. यात कुठलंही दुमत नाही.
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..