अजीब दास्ता है ये.!!

Related image
कोई मंगदा मेरा सी समां
कोई हौंदा सूरत ते फ़िदा
कोई मंगदा मेरी सी वफ़ा
ना तो मंगदा मेरियां बला..


हे ऐकलं आणि चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. आणि खचाखच भरलेल्या लोकलच्या गर्दीत डोळ्याने शोधू लागलो कोणाच्या मोबाईलची रिंगटोन आहे. आणि नजर दारात उभ्या चार पाच मुलींच्या गोळक्यावर थांबली. खूप प्रयत्न केला तिला बघण्याचा पण आणि ती दिसली. पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधलेली. त्यामुळे चेहरा काही दिसला नाही. पण मोबाइल कानाला लावला तेव्हा तिच्या हाताच्या नखांवर केलेलं नक्षीकाम जाम आवडलं. लोकलच्या गर्दीतून एक एक पाऊल पुढे सरकणे किती अवघड हे सर्वांनाच माहीत. तरी मी जीवाची बाजी लावून प्रयत्न करत होतो. पण.. मी ध्येय गाठण्यापूर्वीच तिने ध्येय गाठलं. म्हणजे तीच स्टेशन आलं. मग काय? तोंड पाडून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. माझं आता रोजच काम झालं होतं ती आज दिसेल,आज दिसेल,आज दिसेल पण ती काही दिसेना. असेच २१ दिवस गेले. २२ व्या दिवशी मी तिचा थोडाही विचार न करता. बसायला जागा भेटली या आनंदात खिडकीतून बाहेर बघत होतो तितक्याच बाजूला एक मुलगी येऊन बसली. तिच्या Perfume चा सुगंध छान होता. म्हणजे दिवसभराचा थकवा गेला. मी तिच्याकडे बघून फक्त smile केली आणि परत खिडकीतून बाहेर बघू लागलो. साधारण ३ मिनिटानंतर तिचा मोबाइल वाजला,

कोई मंगदा मेरा सी समां
कोई हौंदा सूरत ते फ़िदा
कोई मंगदा मेरी सी वफ़ा
ना तो मंगदा मेरियां बला..


आणि मी तिच्याकडे बघू लागलो. पण ही तिचं असेल का हे ठरवायचे. म्हणून तिच्या नखांकडे पाहिलं. आजही तितक्याच आवडीने नक्षीकाम केलेलं. आता मला असं झालं कधी एकदा ही कॉल कट करेल आणि मी बोलेल. आणि तिने चक्क २ मिनिटांच्या आत कॉल कट केला. मी मनात,'परफेक्ट आहे ही.!बोल! बोल!'
मी," Nice रिंगटोन."
ती,"ओहह.! Thankyou.!"
परत शांतता.
तिचं पुन्हा," तसं तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्याला रिंगटोन आवडली.तुमचे ब्रेकअप झालंय का?"
आणि माझ्या चेहऱ्यावर असलेल एक एक सेंटीमीटरचं हास्य Mr. Bean बघून हसावं इतकं झालं.
ती,"सॉरी ! मी असं नको होतं ना विचारायला.!"
मी,"हम्म.."
ती,"पुन्हा सॉरी.!(कानाला हात लावत) पण आता विचारलं आहे तर सांगून टाक.!"
तिला उत्तर देण्याआधी मला आवडलं होतं.८ मिनिटांपूर्वी तुम्ही ने सुरू झालेल संभाषण तू पर्यंत आलं होतं.
मी,"हो.!"
ती,"किती वेळेस?"
आता मात्र मी डोळे मोठे केले.
ती,"सॉरी रे.! सांग ना.!"
मी," १सिरियस म्हणजे ४वर्ष सोबत होतो. आणि बाकीचे असेच..!"
ती माझ्या खांद्यावर हात ठेवत," नोट बॅड हा.. बरं चल Number दे तुझा. पुढच स्टेशन माझं आहे.!"
मी नंबर सांगितला तिने रिंग दिली. आणि लगेच Save कर माझ्यासमोर
मी,"okk.!"(आणि गीत नाव save केलं)
ती,"हे काय.! माझं नाव गीत नाहीये!"
मी,"I Know! पण मला विचारायचं नाहीये इतक्यात मला तुझ्यातली जब वि मेट ची करिना आवडली."
ती(माझ्या केसांना विस्कटत),"बरं.! चल बाय.!"
मी फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो. ती दिसेनाशी होईपर्यंत. तितक्याच मोबाईलवर मेसेज आला.
तिचाच होता,'छान आहेस रे तू.!आजपासून तू माझा जिगरी.!'
मी मेसेज वाचुन हसलो.आणि नकळत पुतपुटलो,"पागल आहे पोरगी.!"

क्रमशः

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..