उद्रेकाचा नसलेला लॉकडाऊन...

लॉकडाऊन लागून आता महिना उलटून गेलाय.कॉरोनाच्या माजोरड्या हिमतीपुढे संपूर्ण जग झुकलं.सगळीकडे याचं महामारीच्या चर्चेला उधाण आलंय.जो तो टीव्ही लावून स्वतःला अपडेट करत आहे.जोडीनं भीतीच राक्षण मानगुटीवर बसवून घेत आहे. विचारवंत वेगळ्याच चिंतेने त्रस्त आहेत.अर्थव्यवस्था,आंतरराष्ट्रीय संबंध,कुटुंब नियोजन,वैवाहिक संबंध.पण याच बरोबरीने अजून एक समस्या आहे.ती म्हणजे कुटुंबातील 'मी टाईम' जो हरवला आहे. का बरं? कुटुंबाची घडी या लॉकडाऊनमुळे विस्कटली आहे. खरं तर.. आपण कायम म्हणतो की या धावपळीच्या जीवनात कुटुंबासाठी, स्वतःसाठी वेळ नाही देता येत. आता आहे तो वेळ तर का देऊ शकत नाही आपण?
९० च्या दशकात जागतिकीकरणानंतर भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले त्याचाच परिणाम समाज जीवनावरही झाला.आपल्या देशाची समाजरचना जातीव्यवस्थेवर आधारित आहे पण जागतिकीकरणानंतर त्याच्याच जोडीने आपण आर्थिक स्थरातील समाजरचनाही स्वीकारली.आणि भारतामध्ये जे तीन स्थर काम करत होते.उच्चवर्गीय,मध्यमवर्गीय आणि गरीब(जे आर्थिक निकषानुसार) त्यात एक नवीन वर्ग उदयाला आला उच्च-मध्यमवर्गीय.काय विशेष असेल बर या नवीन वर्गाच? तर या लोकांचे उत्पन्न वाढले.त्यामुळे यांच्या जीवनशैलीत उल्लेखनीय बदल झाला. पण हा वर्ग काही काळ आधी मध्यम वर्गीय म्हणून वावरत होता.त्यामुळे त्याचे जीवन जगण्याचे तत्व काही वेगळे नव्हते.आजही हा घटक पैसा असला तरी शिक्षणाला तितकंच महत्त्वाच स्थान देत होता.उत्पन्न वाढल्यामुळे हा वर्ग शिक्षणावर मोठ्याप्रमाणात खर्च करू शकत होता. त्यांचे मुलं शिक्षणासाठी घरापासून दूर मोठ्या शहरात किंवा विदेशात जाऊ लागले. त्यामुळे समजात चर्चा होऊ लागल्या 'अमक्याचा मुलगा पुण्याला शिकतोय, तमक्याची मुलगी अमेरिकेत गेलीये.' आता ते प्रतिष्ठेचं लक्षण ठरत होतं. त्यामुळे विभक्त कुटुंब अजून लहान होतं गेले. आईवडील कामाच्या ठिकाणी आणि मूल शिक्षणासाठी मोठया शहरात किंवा परदेशात. पण आता झालं असं की २०२० मध्ये सगळीकडे बंद असल्यामुळे पुन्हा एकदा सगळं कुटुंब एका छताखाली येऊन बसले.त्यामुळे सगळ्यांची privacy disturb झाली.

जागतिकीकरणानंतर उदयास आलेल्या या नवीन वर्गाने २४×७ नौकर हे स्वीकारलं नसलं तरी त्यांनी धुणेभांडी करणाऱ्या मावशी हे स्वीकारलं होत. त्यामुळे नक्कीच दोन काम कमी झाले होते.त्यातही ज्या घरातील स्त्री-पुरुष दोघे कमावते तिथे तर चपात्या(पोळ्या)वाल्या मावशी हे ही रुळलं.त्यामुळे लॉकडाऊननंतर या सगळ्या मावश्या/काकी सुट्ट्यावर गेल्या.आता हे कामही स्वतःवर येऊन पडले.त्यातल्या त्यात मुलांची दिनचर्या आणि घरची दिनचर्या यावरून वाद निर्माण होऊ लागले.मध्यमवर्गीय कुटुंबातील अवस्थाही काही प्रमाणात अशीच. कारण मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी सकाळी काम आवरून दुपारच्या वेळेत घरी कोणी नसताना तिचा Me Time जगत असते.मग तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. अगदी झोपुन सुद्धा. पण लॉकडाऊन लावल्यानंतर तिला हा वेळ मिळत नाहीये.त्यामुळे पती-पत्नीतील वाद, मुलांवर होणारी चिडचिड हे प्रमाण वाढलं.गरीब कुटूंबाची अवस्था यापेक्षा बिकट. १० बाय १५ ची एक खोली किंवा १० बाय १० च्या दोन खोल्या.त्यामुळे सतत एकमेकांच्या तोंडासमोर.रागावर नसलेलं नियंत्रण.उद्या हाताला काम असेल की नाही याची चिंता.आता खाऊ पण नंतरच काय? जोडीने व्यसन असेल तर होत नसलेली दारूची सोय.मग हे सगळं बाहेर येतं बायको लेकरांना मारून.शिव्या देऊन.

त्यामुळे बाहेर कोरोना आहे म्हणून घरात बसावं हे मान्यच आहे.पण घरात बसून मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही यासाठी काय करावं हे पण कळायला हवं.सकारात्मक रहा/विचार करा म्हणजे नेमकं काय करायचं.यावर ही बोलायला हवं.अजून किती दिवस! आपण कोणत्या शहरात किती वाढले याच बातम्या रवंथ करणार.यावर ही आता विचार व्हायला हवा.तिसऱ्या स्टेजच लॉकडाऊन लागलं.पण आपण काय केलं दीड महिन्यात. Social Media ला जोक फॉरवर्ड केले.सगळे चमचमीत पदार्थ घरीच बनवून फोटो पोस्ट करून आलेल्या कंमेंट ला like ठोकत बसलो.या व्यतिरिक्त काय केलं? जर उत्तर मिळत नसेल तर शोधा.म्हणजे कसं लॉकडाऊन नंतर मानसिक आरोग्यावर ताण पडणार नाही.
-बुद्धभूषण जाधव.
मो. ७५०७०६५०८१
खरय यार..!ती उच्चस्तरीय मध्यमवर्गीय लोक... चिडचिडेपणा, संताप, व्यसन, काळजी, हतबलता सगळ सगळ खरय..!
उत्तर द्याहटवा