दिल मेरा कहे रहा....
दिल मेरा कहे रहा...
दिल मेरा कहे रहा तू जीले जरा.. है तुझे भी इझाजात करले तू भी मोहब्बत. थांबा थांबा कुणावर मोहब्बत, मी स्वतःवर मोहब्बत करा असा म्हणतोय. तुम्हाला काय वाटलं. तसं साहजिक आहे प्रेम,मोहब्बत,जीव लावणे हे शब्द आपण इतरांसाठी वापरता पण कधी स्वतःवर प्रेम करतो? त्याचा हि आपल्याला विचार करावा लागतो. प्रेमाला आपण किती परकं केलाय आपण इतरांवर प्रेम करतो दुसरे आपल्यावर प्रेम करतात,पण कधी स्वतःवर प्रेम केलंय कसं करणार स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थी पणाची भावना असते. असचं आपल्याला वाटतं. पण काय हरकत आहे असा स्वार्थ असण्यात? मला काही स्वार्थ वाटत नाही.
करीना कपुर खान एका फिल्म मध्ये म्हणते,'मैं अपनी फेव्हरेट हूं!' हा त्या सिनेमाचा प्लस पॉईंट आहे. आपल्याला तो डायलॉग आवडतो. पण फक्त करीना च्या तोंडून आणि ३ तासाचा सिनेमा बघे पर्यंत. का बरं आपण स्वतःला नाही म्हणू शकत असं? कारण आपण स्वतःला नेहमी कमी लेखतो.आणि इतरांकडून अपेक्षा ठेवतो कि त्याने माझी इज्जत करावी, मान द्यावा. पण गरज असते आपण स्वतःला मान देण्याची, स्वतःवर भरभरून प्रेम करण्याची.
मी तर हे अभिमानाने सांगू शकतो."मैं अपना फेव्हरेट हूं!"😊
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा