निरोप समारंभ(farewell)

           निरोप समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. कॉलेजचा शेवटचा दिवस,ज्या कॉलेजमध्ये आपण सलग ३-४ वर्ष दंगा मस्ती आणि थोडाफार अभ्यास केलेला असतो. कॉलेज खरं आपल्याला आपल्यातील मी शोधण्यास मदत करतो. कॉलेजला असताना नेहमी वाटतं कधी एकदा कॉलेज संपेल आणि नौकरी करू , पैसा कमवू म्हणजे कोणावर अवलंबून राहणार नाही. पण आज जेव्हा हा दिवस जवळ आला तर हृदय जोरजोरात धडधडत आहे. उद्या पासून हे राज भेटणारे मित्र आता कधीतरी भेटणार प्रत्येक जण आपापल्या विश्वात रमणार.
          तसं पाहता हा निरोप गरजेचा असतो कारण एक नवी सुरुवात यानंतर होणार असते.बऱ्याच जणांना कॅम्पस मध्ये जॉब मिळतात. तर काही जणांना नवी सुरुवात करायची असते पण ही एक संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची.बघितलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची.पण आज जेव्हा कार्यक्रमानंतर सभागृहातून पार्किंग कडे निघलो तेव्हा जणू आठवणीनी जणू शर्यत लावली होती.प्रत्येक आठवण डोळ्यातील पाण्यासोबत तरंगत होती.पण चेहऱ्यावर एक हास्य आणि मनात आत्मविश्वास जोडीला घेऊन कॉलेजच्या बाहेर गाडी काढली.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..