कोडं..
कोडं..
तू मला रोज पडणार कोडं,
कोऱ्या कागदावर रोजचं
कवितेतून सुटणार कोड.
माझी कविता तुला
नेहमीचं कोड वाटते
ते कोड नसतंच ते तर
मला उलगडलेलं उत्तर असतं
काव्य रूपात फक्त
तुझं हसणं, तुझं बोलणं,
तुझं लाजण, तुझं रुसणं,
तुझं तुझं आणि फक्त
तुझंच काव्य असतं
आणि तुला वाटतं
मी रोजचं कोड मांडतो.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा