पण मला तू हवी आहेस..
पहाटे ५ वाजेला फोन वाजला की एक तर राग येतो किंवा पोटात गोळा येतो. असंच काही झालं सुमीत च्या मनात.त्याने फोन उचलला आणि तो जोरजोरात रडायला लागला. त्यांच्या रडण्याच्या आवाजाने एव्हाना पूर्ण घर जागी झालं होत. कोणाला काहीच कळत नव्हतं नेमके काय होत आहे.सगळे एकमेकांचे तोंड पाहत होते.तितक्यात तो उठला आणि म्हणाला,'मला तिच्याजवळ गेलं पाहिजे.' त्याचे बाबा,'अरे, झाले तरी काय हे तर सांग.?' तो बोलला,"प्रियावर कोणीतरी ऍसिड अटॅक केला."प्रिया सोबत सुमीतच लग्न ठरलं होतं. आई वडिलांच्या पसंतीने हे लग्न होत होतं. लग्न अवघ्या दोन महिन्यावर होतं. हा हल्ला का झाला हे अजूनही स्पष्ट नव्हतं.
सुमीत हॉस्पिटल मध्ये पोहचला तर तिची अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा अर्धा चेहरा प्लास्टिक वितळाव तसं वितळत चाललं होतं. त्याने स्वतःला सावरलं आणि तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाला,'Dont worry, मी आहे तुझ्यासोबत.!' ती या स्थितीतही त्याला बोलली,'एक सांगू ऐकशील माझं?' तो,'तू बोल ना!मी ऐकत आहे.'ती,'तू माझ्या सोबत लग्न नको करू, मला माहित आहे. ऍसिड हल्ला झालाय माझ्यावर आणि मी आता आयुष्यभर अशीच विद्रुप राहील.तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल सहज.'तो,'नक्कीच तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल,पण तू नाही मिळणार.आणि मी तुझ्यावर प्रेम केलं,तुझ्या रूपावर नाही.'तो बोलत होता आणि मागे उभे असलेले त्याचे आई-वडील आपल्या मुलाच्या समजूतदारपणा पाहून थक्क झाले होतं.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा