आणि मी विरघळत गेलो..
"हे, सांग ना.!"(असं पावसाकडे बघत तिने माझ्याखांद्यावर डोकं ठेवलं.)
मी,"काय सांगू?"
ती,"हेच की तुला पाऊस जास्त आवडतो की मी?"
मी,"हे काय नवीन?"
ती,"सांग ना.!"
मी,"प्रेम करतेस माझ्यावर?"
ती,"शंका आहे का तुला.!"
मी(हसून),"शंका असते तर विचारले असते का?"
ती(हसून),"आता माझ्या प्रश्नाचे उत्तर दे!"
मी,"मला पाऊस आवडतो.!"
ती,"मला वाटलं तू म्हणशील की मी आवडते तुला.!"
मी(हसून),"तेच तर, मला पाऊस आवडतो.कारण मला पावसात भिजलेली तू आवडतेस."
ती,"मला नाही आवडत पाऊस!(असं म्हणून तिने तोंड वाकड केलं)"
मी,"म्हणून तर मला आवडतो.कारण पावसात भिजल्यावर तू जेव्हा रागावतेस ना.तेव्हा मला तू खूप सुंदर दिसतेस. तुझ्या मानेवरून पावसाचा थेंब जेव्हा ओंघळत तुझ्या छातीवर येतो.तेव्हा खर सांगायचे तर मी फक्त बघतच राहतो. म्हणजे बघ! मला त्या थेंबाचा हेवा वाटू लागतो.कारण तो शरीराला फक्त स्पर्श करत नसतो तर तुझ्या शरीरात विरघळत असतो. पावसात भिजल्यावर जेव्हा तू विनाकारण कॉफी माझ्यासोबत share करतेस ते आवडत मला.कारण मला माहित आहे. २ कॉफी चे पैसे तू ही देऊ शकतेस आणि मी ही.
तरी उगीच मला कॉफी घ्यायची नसते. आणि तू एक घोट घेतला की हळूच माझ्यासमोर कॉफी मग सरकवतेस. निघतांना तू जेव्हा मला मिठी मारतेस आणि म्हणतेस थोड्यावेळ थांबशील.!म्हणून मला पाऊस आवडतो. आणि पाऊस आवडतो कारण पावसात भिजलेली तू माझ्या मिठीत विरघळतेस."
ती,"तू खरंच इतकं प्रेम करतोस माझ्यावर?"
मी,"शंका आहे का?"
ती(हसून),"तुला सांगू!मला पाऊस आवडत नाही तरी मी पाऊस पडला की तुला भेटायला बोलावते.कारण मला भिजलेलं पाहून तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तो मला सुखावतो.आणि कॉफीचं म्हणशील तर मला माहित आहे तुला माझ्याच कॉफी मग मधून कॉफी घ्यायची असते. आणि तुझ्या मिठीत आल्यावर जेव्हा माझ्या चिंब भिजलेल्या मानेवर तुझे गरम श्वास जाणवतात. तेव्हा मी विरघळत जाते. आणि मला तुझ्यात विरघळायला हवं असतं. अगदी तसंच जसं पावसाच्या थेंबाने मातीत विरघळून जावं."
मी,"चल मग परत एकदा विरघळू एकमेकांमध्ये.(आणि मी तिला पावसात ओढले.तसे तिने मला मिठी मारली.ती विरघळली की नाही माहीत नाही पण मी नक्कीच विरघळत होतो)"
-बुद्धभूषण जाधव
भारी जुन्या आठवणी ताज़्या झाल्या...👌👌✌✌🌷🌷
उत्तर द्याहटवाधन्यवाद����
हटवा