गुदमरणारा मोकळा श्वास..

'प्रेम हे प्रेम असते,
तुमचे आमचे सेम असते.'
प्रेम आणि त्यांच्याभोवती फिरणारी प्रत्येक संकल्पना या इतक्या व्यापक आणि प्रगल्भ असतात की त्याला भाषा,जात,धर्म,पंथ,लिंग असे बंधन नसते.आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधासाठी ब्रिटिशांनी भारतात सत्ता असताना बनवलेला १५८ वर्षांपूर्वीचा #कायदा३७७ गुरुवार, ६ सप्टेंबर २०१८ रोजी रद्दबातल ठरवला. पण समाजाच्या ठेकेदाराकडून अपेक्षित असणारी उदासीनता परत एकदा अनुभवायला मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाश्चिमात्य देशांच्या प्रभावामुळे आणि बदलत्या काळामुळे हा निर्णय घेण्यात आला.तर मुळात आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, कलम३७७ हा कायदा इंग्रजांचे अपत्य आहे.त्यामुळे किती दिवस दुसऱ्याचे लेकरू कड्यावर घेऊन फिरायचे.
आपल्या देशात प्रत्येकाला सम्मानपूर्वक वागणूक दिली जाते.मग तो सम्मान एखाद्याच्या लैंगिकतेविषयी का असेना. म्हणजे हेच बघा ना.! आपल्याकडे जोगता, जोगतीण किंवा तमाशाच्या फडावर नाचणारे पुरुष या संकल्पना फार आधीपासून अस्तित्वात होत्या आणि त्याचा समाजानेही स्विकार केला होता.
हळूच इतिहासात डोकावले असता कळते की,विष्णूच मोहिनी रुप ज्यामध्ये खुद्द विष्णूने मोहिनीच मोहक रूप घेऊन भस्मासुराला भुलवण्याचा प्रयत्न केला होता. ज्या वस्तूला हात लावशील त्याची राख होईल.अस वरदान त्याला देण्यात आलं होतं.ज्या शंकराने त्याला हे वरदान दिलं होतं,त्यावरचं या वरदानच प्रात्यक्षिक करण्याचं भस्मासूराने ठरवलं.तेव्हा भस्मासूराने आपल्याला स्पर्श करून आपलीच राख करावी या उद्देशाने विष्णूने मोहिनी रुप धारण केलं. अयप्पा स्वामी हे शंकर आणि मोहिनी रुपातील विष्णूचंच अपत्य होतं.
कमसूत्राची मुळसुद्धा याच देशात रुजली असून तेही प्रेमाचे प्रतीक आहे.पण काळ जसजसा पुढे जात गेला.तसतसं आपल्याला या गोष्टीचा विसर पडला.
जगभरात आज जेथे समलैंगिक संबध कायदेशीर आहेत तेथेही असाच लढा कार्यकर्त्यांनी दिला.अमेरिकेतील समलैंगिकासाठी हार्वे मिल्क यांनी आपले आयुष्य वेचले.नेदरलँड या देशाने सर्वात आधी म्हणजे डिसेंबर २००० मध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मंजुरी दिली.अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये समलैंगिक लग्नाला मान्यता दिली.
'दोन सज्ञान समलैंगिकानी ठेवलेले संबंध ही पूर्णपणे खासगी बाब असून तो गुन्हा नाही.'असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे समाजातील काही घटकाने समर्थन केले.यात निर्माता-दिग्दर्शक करणं जोहर ते हरीश अय्यर सर्वांचाच समावेश होता.
पण हा मुद्दा इथे संपत नाही तर आता बघावे हे लागतील की, मोठ्या शहरातून जो सकारात्मक प्रतिसाद मिळाला.तो छोट्या शहरातून मिळेल का?समाजामध्ये जनजागृती साठी सरकारी यंत्रणा काही उपक्रम राबवेल का?

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?