उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?
तुम्ही कधी प्रेम केलंय?
मी पण काय विचारतोय! केलंच असणार. घाबरून जाऊ नका.! मी काही तपशीलवार विचारणार नाही. विचारण्याचा उद्देश फक्त इतकाच की मी जे सांगणार आहे त्याच्याशी एकरूप व्हायला. ती एक आठवण पुरेशी राहील.
जेव्हा आपण नवीन नवीन प्रेमात घडत असतो(मी पडणे म्हणत नाही. कारण प्रेम तुमच्यातील तुम्ही शोधून देतो). तेव्हा खूप गोष्टी या पहिल्यांदा होत असतात.म्हणजे बघा.. बऱ्याच वेळेला आपण शरीराने एका ठिकाणी असतो.पण मन मात्र भटकून येतं. काही वेळेला हवेची एखादी थंड जुळून आली की शहारून येत जणू प्रियकर/प्रियसी चा स्पर्श झाला. आपण नेहमी भविष्याचा विचार करतो. स्वप्न बघतो कारण आपल्याला ते मृगजळ हवं हवंस असतं.त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटत असतात.

"तुला माहीत आहे का?तुझ्या देहाचा मनमोहक गंध माझ्या रोमारोमात भिनला आहे."तिच्या हाताच्या बोटांशी खेळत मी तिला म्हंटलं.
ती स्मितहास्य देत म्हणाली,"तू लेखक आहेसं.मला माहीत आहे पण कसं असतं ना.!रायटर साब.या गोष्टी पुस्तकात छान वाटतात."
मी तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत तिला म्हंटल,"जसं आपल्याला एकमेकांच्या श्वासांची उष्णता जाणवते.जसं स्पर्शाच्या संवादाने आपण एकमेकांच्या मनात चाललेली चलबिचल ओळखतो.तसंच काही देहाचा गंध दरवळतो."
(ती फक्त ऐकत होती आता)
"कधीकधी मला माझ्या देहातून फक्त तुझे अस्तित्व खुणावत असते.वाऱ्याची प्रत्येक जुळूक तुझा गंध माझ्या शरीरातून असा काही दरवळतो.जणू कोणी अत्तराच्या बाटलीत झाकण उघडे ठेवले आहे.आणि वातावरणात एकच म्हणण्यापेक्षा निसर्गात एकच सुवास शिल्लक राहीला आहे.मला तर कधी कधी वाटतं लोक कशाला अत्तराच्या बाटल्यावर इतका खर्च करतात? आणि उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद करत. मनात उत्पन्न होणाऱ्या अभिलाषा दाबून ठेवतात. गालिबचा एक शेर आहे,
'दिमाग-ए-इत्र-ए-पैराहन नहीं हैं,
गम-ए-आवारगीहा-ए-सबा क्या हैं।'
ती माझ्या गालावर ओठ टेकवत मला बिलगली आणि हळूच म्हणाली," प्रियसीच्या देहाचा (अत्तराचा) गंध जर तुमच्या अभिलाषा उत्पन्न करत असेल तर त्या पूर्ण करण्यात प्रियसीची काहीच हरकत नाहीये."
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा